मुक्ताईनगर 29 ऑक्टोबर: एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा भाजप वर कोणताही परिणाम होणार नाही किंवा कोणताही नेता भाजपला सोडून जाणार नाही असं मत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी व्यक्त केले होतं, महाजन यांच्या विधानाला खडसे (NCP Leader Eknath khadse) यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. आगामी काळात कुणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती सक्षम आहे हे दिसून येईन असं खडसे यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी आगामी काळात राष्ट्रवादी आणि भाजप मधील सत्ता संघर्षाचे एक प्रकारे संकेतच दिले आहेत.
खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अनेक कार्यकर्ते आणि नेते हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जातं आहे, मात्र खडसे हे राष्ट्रवादीमध्ये गेले तरी भाजपा मधील कोणीही नेते त्यांच्या मागे जाणार नाहीत किंवा त्यांच्या जाण्याने भाजपला ही कोणताही फरक पडणार नाही अशा प्रकारच वक्तव्य भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केलं होतं.
गिरीश महाजन यांच्या विधानाचा समाचार घेतांना खडसे म्हणाले, आज कोणताही मोठा बदल दिसणार नसला तरी आगामी काळात मात्र कोणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती सक्षम आहे हे दिसून येईल. पक्षात कार्यकर्ते टिकवूण ठेवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना अशी वक्तव्य करावीच लागतात.
अखेर कांदा लिलाव सुरू होणार, सणा-सुदीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा
खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. किंबहुना त्यांच नाव राष्ट्रवादीने पुढे केले असल्याचंही सांगण्यात येते. त्यावर बोलताना खडसे म्हणाले, मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला नाही किंवा कोणतेही पदही मागितलेली नाही. पद मिळाले तरी काम करणार आहे आणि नाही दिलं तरी कार्यकर्ता म्ह्णून काम करणार आहे. आपल्या मतदारसंघात रखडलेली विकास कामे पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. मात्र पक्षाने आमदारकी दिली आनंदच होईल असं मतही त्यांनी व्यक्त केलं.