Home /News /maharashtra /

Cm Eknath Shinde & BJP : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाचा मुकुट पण मलईदार खाती भाजप ठेवणार आपल्याकडे

Cm Eknath Shinde & BJP : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाचा मुकुट पण मलईदार खाती भाजप ठेवणार आपल्याकडे

शिवसेनेत (shiv sena) 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत (bjp) जाण्याचा निर्णय घेतला आणि भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

  मुंबई, 03 जुलै : मागच्या दोन दिवसापूर्वी राज्याच 30 वा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी शपथ घेतली. दरम्यान मागच्या 15 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra government) जी काही उलथापालथ सुरू आहे त्यांचे मुख्य केंद्र एकनाथ शिंदेच आहेत. शिवसेनेत (shiv sena) 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत (bjp) जाण्याचा निर्णय घेतला आणि भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान मंत्रीमंडळातील खाते वाटप करताना बंडखोर आमदारांना कोणती खाती आणि भाजपला कोणती खाती याबाबत भाजपने प्लॅन केला असल्याचे समजत आहे.

  मुख्यमंत्रिपदाचा मुकुट जरी एकनाथ शिंदे यांना दिला असला तरी महत्त्वाची खाती घेण्याचा फॉर्म्युला भाजपने तयार केला आहे. यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली खाती भाजप स्वतः कडे ठेवणार असून शिवसेनेकडे असलेली खाती शिंदे गटाकडे देण्यात येणार आहेत. यात अर्थात काही खात्यांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. 

  हे ही वाचा : शिवसेना पक्ष आमचाच, एकनाथ शिंदे गटानेही बजावला व्हीप, गटनेतेपदी शिंदेच!

  याबाबत दैनिक पुढारीने वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे नगरविकास, उद्योग, परिवहन, पर्यावरण, राज्य रस्ते विकास, वने, पाणीपुरवठा, उच्च व तंत्रशिक्षण, कृषी अशी महत्त्वाची खाती शिवसेनेकडे होती. ही खाती शिंदे गटाकडे जातील. मुख्यमंत्री शिंदे हे नगरविकास खात्यासह सामान्य प्रशासन, राज्य रस्ते विकास आदी खाती स्वतःकडे ठेवतील. पण शिंदे गटाला अर्थ आणि गृह, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम या खात्यांची मागणी केली आहे.

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे गृह आणि अर्थ ही खाती ठेवतील. जलसंपदा हे खाते राष्ट्रवादी आणि भाजपच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. त्यामुळे जलसंपदा खाते भाजप सोडणार नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची जलसंपदा विभागातील प्रकरणाची चौकशी सुरू आहे. राष्ट्रवादीकडील गृह, अर्थ व नियोजन, ग्रामविकास, समाजकल्याण, जलसंपदा, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, सहकार, गृहनिर्माण, उत्पादन शुल्क तर काँग्रेसकडील महसूल, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास, इतर मागास वर्ग, दुग्धविकास, महिला व बालकल्याण आदी खाती भाजपला हवी आहेत. शिंदे गटाकडे शिवसेनेचे 39 आमदार, तर 11 अपक्ष आ छोटे पक्ष यांचे आमदार आहेत.

  हे ही वाचा : 'वडिलकीचा सल्ला देतो..फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका', माजी आमदाराचं एकनाथ शिंदेंना पत्र

  13 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदे देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी शिंदे गटात जोरदार रस्सीखेच आहे. शिंदे यांची आपल्या गटात मंत्रिपदे देताना कसरत आहे. दुसरीकडे भाजपमध्ये महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, ग्रामविकास, जलसंपदा या महत्त्वाच्या खात्यांसाठी स्पर्धा आहे. 2014 च्या फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला केवळ दहा मंत्रिपदे आली होती. पण यावेळी शिंदे गटाला जास्त मंत्रिपदे द्यावी लागणार आहेत.

  रिमोट कंट्रोल भाजपकडे

  भाजप आणि त्यांचे समर्थक 120 आमदार भाजपकडे असताना त्यांनी राजकीय नफ्याचा विचार करून मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे. परंतु ही खेळी करताना या सरकारचा रिमोट कंट्रोल हा भाजपकडे असावा, अशी खात्यांची व्यूहरचना आमची असेल, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shiv Sena (Political Party)

  पुढील बातम्या