भाजप देणार विद्यमान आमदारांना धक्का, या मतदारसंघातून तिकीट कापण्याची शक्यता!

ज्या विद्यमान आमदारांनी गेली 5 वर्ष पक्षासाठी कामं केली नाही अशा आमदारांना भाजप तिकीट कापरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 08:32 AM IST

भाजप देणार विद्यमान आमदारांना धक्का, या मतदारसंघातून तिकीट कापण्याची शक्यता!

मुंबई, 30 सप्टेंबर : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झाली. जवळपास साडेचार तास चाललेल्या बैठकीमध्ये विधानसभा उमेदवारांच्या नावावरती अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. पण अशात भाजप आता विद्यामान आमदारांचं तिकीट कापणार की काय अशी चर्चा आहे. विदर्भात आणि नागपूरमध्ये विद्यमान आमदारांना भाजपकडून डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज मंत्र्यांची मेगाभरती झाली. त्यामुळे भाजप आता नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आहे. त्यात ज्या विद्यमान आमदारांनी गेली 5 वर्ष पक्षासाठी कामं केली नाही अशा आमदारांचं भाजप तिकीट कापरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या आज जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीमध्ये कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान, नागपूर दक्षिण, नागपूर पश्चिम आणि उत्तर नागपूरसह विदर्भातही काही आमदारांना डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा मीडियामध्ये आहे. काँग्रेसने रविवारी 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आता कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने 90 टक्के उमेदवारांची नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे. तर युतीमुळे काही जागांचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांनी गेल्या 5 वर्षात पक्षासाठी कामं केली नाही अशा 20 टक्के नेत्यांना भाजपकडून नारळ देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या - या मतदारसंघात युती तुटणार, शिवसेनेचा भाजप विरोधात एल्गार

विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून अनेक दिग्गज नेत्यांची जोरदार इनकमिंग झाली. त्यामुळे भाजपने जर आयात नेत्यांना उमेदवारी दिली तर भाजपमध्ये अनेकांमध्ये नाराजीचा सूर दिसू शकतो. अशा वेळी आता भाजप काय खेळी खेळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Loading...

इतर बातम्या - अजित पवारांवर शिवसेनेकडून जबरी टीका, म्हणाले 'दादा कुछ तो गडगड है'

दरम्यान, रविवारी शिवसेनेकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यात आले. सेनेपाठोपाठ भाजपनेही संघटनमंत्र्यांना AB फॉर्मचं वाटप केलं आहे. राज्यातील 6 विभागात 6 संघटन मंत्र्यांना AB फॉर्म घेऊन जाण्याचा पक्षाकडून सूचनाही देण्यात आल्या आहेत. यादी जाहीर होताच उमेदवारांना तासाभरात फॉर्म मिळावेत यासाठी भाजपने ही व्यवस्था केली असल्याची माहिती आहे.

शिवसेना-भाजप युतीचं या चार जागांवर अडलं घोडं, तोडगा निघताच होणार घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली तरी शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून अजून वाटाघाटी सुरूच आहे. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक संपली आहे. शिवसेनेने केलेली 126 जागांची मागणी भाजपने फेटाळली आहे. शिवसेनेला 124 जागा देण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने 126 जागांची मागणी फेटाळल्यानंतर आता शिवसेना काय भूमिका घेते, याकडे संगळ्यांचे लक्ष लागले आहेत.

इतर बातम्या - विधानसभेसाठी भाजप पहिली यादी आज येणार, उमेदवारांची नावं निश्चित!

चार जागांवर युतीचं अडलं घोडं..

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळी (वर्धा), सावनेर (नागपूर), माण- खटाव (सातारा) आणि बेलापूर (नवी मुंबई) या चार जागांवर युतीचं घोडं अडलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये अद्याप वाटाघाटी सुरूच आहे. आता अंतिम टप्प्यात चर्चा सुरू असून तोडगा निघताच युतीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या युतीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 08:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...