महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: अमित शहांच्या बैठकीत मोठा निर्णय

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: अमित शहांच्या बैठकीत मोठा निर्णय

अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीमध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डादेखील उपस्थित होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : लोकसभा निवडणुकांमध्ये दमदार विजय मिळवल्यानंतर आता भारतीय जनता पार्टी विधानसभेच्या तयारी लागली आहे. त्यासाठी नेत्यांच्या बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका या मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आसल्याचा निर्णय अमित शहा यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकांसाठी 3 राज्यांमध्ये आपली कंबर कसली आहे. यासाठी मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयात राज्यातील भाजप उमेदवार आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीमध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डादेखील उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका लढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन व राज्याला बसलेला अतिवृष्टीचा तडाखा यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती. राज्यात पुरस्थिती असतानाही यात्रा सुरूच ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांवर विरोधपक्षांनी चौफेर टीका करत हल्लाबोल केला होता. मात्र, विरोधकांच्या दबावाला बळी न पडता भाजपने ही यात्रा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या - राष्ट्रवादीला मोठा धक्का? छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर, मुंबईत तातडीने बोलावले

यात्रेचा दुसऱ्या टप्पा ज्या ठिकाणावरून सुरू होणार आहे त्या ठिकाणच्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना महाजनादेश यात्रेचा दौरा प्राप्त झाला आहे.  22 ऑगस्ट रोजी धुळे येथून सकाळी महाजनादेश यात्रेला प्रारंभ आहे. अमळनेर येथे सकाळी 11.30 वाजता तर धरणगाव येथे 12.30 वाजता महाजनादेश यात्रा पोहोचणार आहे तर दुपारी 1.30 वाजता जळगाव येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता जामनेर येथे व सायंकाळी पाच वाजता भुसावळात जाहीर सभा होणार आहे.

अमरावतीजवळच्या गुरुकुंज मोझरी इथून याच महिन्यात यात्रेला सुरूवात झाली होती. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी यात्रेला हिरवी झेंडी दाखवली होती. त्यानंतर विदर्भात ही यात्रा फिरली.  सभा, लोकांशी संवाद, पत्रकार परिषदा अशा माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारचं काम लोकांपर्यंत पोहोचविणार आहेत.

इतर बातम्या - प्रेमासाठी मुलीने वडिलांच्या गळ्यावर 10 वेळा फिरवला चाकू, बाथरूममध्ये जाळला मृतद

खास रथाच्या माध्यमातून मुख्यमंत्री या यात्रेवर असून राज्यातल्या सर्वच भागात जाण्याचं त्यांचं नियोजन आहे. निवडणूक जाहीर होण्याच्या आधी प्रचाराचा एक टप्पा पूर्ण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या आधी आदित्य ठाकरे यांनी जनआर्शीर्वाद यात्रा काढली होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही यात्रांची घोषणा केलीय. खासदार डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या यात्रेचं नेतृत्व करत आहेत.

सोसायटीत गाडी लावताय तर सावधान, पाहा या भुरट्या चोराचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 03:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading