Home /News /maharashtra /

भाजपला खिंडार, एकनाथ खडसेंसोबत आता राष्ट्रवादीमध्ये मोठं इनकमिंग

भाजपला खिंडार, एकनाथ खडसेंसोबत आता राष्ट्रवादीमध्ये मोठं इनकमिंग

भुसावळ भाजप आमदार संजय सावकारे यांच्या पत्नी आणि दोन माजी आमदरा आज एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

    मुंबई, 23 ऑक्टोबर : एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर अनेक समीकरण बदलताना पाहायला मिळत आहेत. भाजप नेते एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे. त्यांची कन्या रोहिणी खडसे यदेखील मुंबईत उपस्थित राहणार आहेत. तर एकनाथ खडसे यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे. नाथाभाऊंसोबत अनेक कार्यकर्ते आणि नेते आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती. आज काही नेत्यांचा प्रवेश होणार आहे. धुळे शहादा अकलाकुवा अकोला येथील माजी आमदार यांचा प्रवेश हा स्थानिक पातळीवर जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होईल. मुक्ताईनगर पालिका आणि बोदवड नगर पालिकेतही आज अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा-पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक बेपत्ता, सुसाईड नोट मिळाल्यानं मोठी खळबळ भुसावळ भाजप आमदार संजय सावकारे यांच्या पत्नी आणि दोन माजी आमदरा आज एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे जळगाव जिल्हा चे माजी अध्यक्ष आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. एकेकाळी भाजपात असलेले आता अमळनेर विधानसभा राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईड्स पाटील यांनी खडसे यांचं स्वागत केल. खडसे गेल्यामुळे काय होत याचा प्रत्यय लवकरच गिरीश महाजन यांना येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर धुसफूस सुरू होणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या