मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

निवडणुकीसाठी काहीही! भाजप Vs भाजप आणि राष्ट्रवादी Vs राष्ट्रवादी आमने-सामने

निवडणुकीसाठी काहीही! भाजप Vs भाजप आणि राष्ट्रवादी Vs राष्ट्रवादी आमने-सामने

राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. प्रारंभी बिनविरोध होणार अशी चर्चा असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीमध्ये

राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. प्रारंभी बिनविरोध होणार अशी चर्चा असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीमध्ये

राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. प्रारंभी बिनविरोध होणार अशी चर्चा असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीमध्ये

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pandharpur, India

पंढरपूर, 12 नोव्हेंबर : राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. प्रारंभी बिनविरोध होणार अशी चर्चा असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीमध्ये वेगळेच चित्र पाहण्यात मिळाले आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा अजब सामना रंगला आहे.

भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अखेर अंतिम टप्प्यात आली असून यासाठी चेअरमन भाजपचे खा. धनंजय महाडिक यांची भीमा शेतकरी विकास आघाडी तर राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या भीमा बचाव परिवर्तन पॅनलमध्ये समोरासमोर काट्याची टक्कर भिडली आहे. तर यामध्ये दोन्हीही व्यासपीठावर शत्रूचा शत्रू आपला मित्र समजून मातब्बर नेते मैदानात उतरल्याने निवडणुकीत रंगत प्राप्त झाली असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.

(सेनेला रोखण्यासाठी केसरकर-राणे आले एकत्र, सिंधुदुर्गात 'या' निवडणुकीत दिली विजयी सलामी) 

मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील काही गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी १३ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार असून १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असणार आहे.

दरम्यान, खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या दोन पॅनल मध्ये लढत होत असलेली निवडणूक प्रारंभी बिनविरोध तर काही अंशी एकतर्फी वाटणारी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महत्त्वपूर्ण वळणावर आली आहे. प्रचारापासून दूर असलेले परिचारक कुटुंब भिमा बचाव परिवर्तन पॅनलमध्ये सक्रिय झाल्याने निवडणुकीत जान प्राप्त झाली आहे.

भीमा बचाव पॅनलकडून माजी आमदार राजन पाटील, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, दिलीप घाडगे, कल्याणराव पाटील हे धुरा सांभाळत असतानाच पाटकुल येथील सभेत प्रणव परिचारक तर कुरुल येथील सभेमध्ये उमेश परिचारक सभांद्वारे थेट माहडिक यांचे संस्कार काढल्याने चांगलेच सक्रिय झाले आहेत. तर शेवटच्या सभेमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी सभा घेत स्वपक्षीय भाजप खासदारा विरुद्ध दंड थोपटले आहेत.

(नाशिकने वाढवलं शिंदेंचं टेन्शन! दादा भुसेंच्या बैठकीला सुहास कांदेंची दांडी)

दरम्यान, धनंजय महाडिक यांच्या भीमा विकास आघाडी पॅनल मधून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम समजून राजन पाटील विरोधी गट व्यासपीठावर दिसत असून यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, माजी उपसभापती मानाजी माने, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भगीरथ भालके, यांचा समावेश असून सभांमधून ते विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

निवडणूक भीमा कारखान्याची असली तरी लोकनेते साखर कारखान्याच्या खाजगीकरणासह वजन काटा व ऊस दराबाबत प्रत्येक सभांमधून आरोप करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भीमा निवडणुकीसाठी तिसरा पॅनलची तयारी करणाऱ्या भैया देशमुख यांनी अखेरीस धनंजय महाडिक यांना पाठिंबा देत नेहमीच्या स्टाईलने अनगरकरांवर हल्लाबोल करीत असले तरी अखेरच्या क्षणी धनंजय महाडिक यांच्याबरोबर हात मिळवणे केल्याच्या आरोप करीत राजन पाटील यांना पाठिंबा असलेल्या निवृत्त कामगारांबरोबर त्यांचा उडालेला गोंधळ हा निवडणुकीला गलबोट लागणारा ठरला आहे.

दरम्यान, या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते, तर मंत्री चंद्रकांत पाटील बारीक हालचालींवर लक्ष वेधून सामान्य कार्यकर्त्याला ही फोन करून महाडिक गटाकडे आकर्षित करत आहेत. तर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचेही जुन्या दोस्ताच्या संस्थेवर लक्ष असल्याने या हायहोल्टेज लढतीकडे राज्याचे लक्ष लागले असले तरी कारखान्याचे खरे मालक हे सभासद कोणाला कौल देणार येत्या १४ तारखेला समोर येणार आहे.

First published:

Tags: Marathi news