मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आदित्य ठाकरेंच्या होमग्राऊंडवर भाजपची 'हंडी', शिवसेनेचे 3 आमदार असूनही वरळीत शेलारांचं शक्तीप्रदर्शन

आदित्य ठाकरेंच्या होमग्राऊंडवर भाजपची 'हंडी', शिवसेनेचे 3 आमदार असूनही वरळीत शेलारांचं शक्तीप्रदर्शन

भाजपने (BJP) तर आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) होम ग्राऊंडवरच दही हंडीच्या (Dahi Handi) जंगी तयारीला सुरूवात केली आहे. आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये (Worli) भाजपकडून दही हंडीचं आयोजन करण्यात आलं आहे.

    मुंबई, 16 ऑगस्ट : कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच दहीहंडी (Dahi Handi) आणि गणेशोत्सव दणक्यात साजरा होणार आहे, त्यातच मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असल्यामुळे सगळेच राजकीय पक्ष जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. भाजपने (BJP) तर आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) होम ग्राऊंडवरच दही हंडीच्या जंगी तयारीला सुरूवात केली आहे. आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये (Worli) भाजपकडून दही हंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या जवळचे मानले जाणारे संतोष पांडे यांनी या दहीहंडीचं आयोजन केलं आहे. जांभोरी मैदानात 19 तारखेला भाजपच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया दरम्यान वरळीमधल्या भाजपच्या दहीहंडीवर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. दहीहंडीमध्ये आम्ही राजकारण आणणार नाही. जांभोरी मैदानाचं सुशोभिकरण केलं म्हणूनच तिथे आम्ही दहीहंडी घेत नाही. वरळी आम्ही ए प्लस केली आहे, त्यामुळे अनेकांना वरळी आवडायला लागली आहे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. वरळीत तीन आमदार एकट्या वरळीमधून शिवसेनेचे 3 आमदार आहेत, तरीही जांभोरी मैदान दहीहंडीसाठी घेण्यात भाजपला यश आलं आहे. वरळीमधून आदित्य ठाकरे, सुनिल शिंदे आणि सचिन अहिर हे तीन शिवसेनेचे आमदार आहेत. सुनिल शिंदे हे वरळी मतदारसंघातून विधानसभेत निवडून जायचे, पण 2019 ला या मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली. आदित्य ठाकरेंनी वरळीची जागा जिंकल्यानंतर सुनिल शिंदे यांचं विधान परिषदेमध्ये पूनर्वसन करण्यात आलं. तर 2019 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सचिन अहिर राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आले. सचिन अहिर यांनाही नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतून आमदार करण्यात आलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Aaditya thackeray, BJP, Shivsena

    पुढील बातम्या