• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • नवी मुंबईनंतर ठाण्यातही भाजपला खिंडार? काँग्रेसच्या युवा नेत्याने दिले संकेत

नवी मुंबईनंतर ठाण्यातही भाजपला खिंडार? काँग्रेसच्या युवा नेत्याने दिले संकेत

सत्यजित तांबे यांनी ठाणे जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याचे संकेत दिल्याने भाजपमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.

  • Share this:
ठाणे, 13 मार्च : ठाणे जिल्हा भाजपमध्ये धुसफूस सुरू असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून बोललं जात आहे. त्यातच तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत असताना भाजपचे माजी ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी डी वाय फाउंडेशनच्या वतीने बालाजी चषकाचे आयोजन केले होते. यावेळी गेल्या पाच वर्षांपासून भिवंडीपासून अलिप्त असलेले युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ठाणे जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याचे संकेत दिल्याने भाजपमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. भाजपचे माजी ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे हे काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष असताना काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी भिवंडीत येऊन महात्मा गांधी आणि आरएसएस यांच्याबाबत विधान केल्याने त्यांना भिवंडी कोर्टाची वारी करावी लागली होती. मात्र मोदी सरकार आल्याने चोरघे भाजपमध्ये दाखल झाले होते. मात्र भाजपमधील गटबाजीने ते पुन्हा काँग्रेसमध्ये येणार असल्याचे संकेत  सत्यजित तांबे यांनी त्यांच्या भाषणातून दिले आहेत. हेही वाचा- VIDEO : 'तुमच्यातीलच एखादा ज्योतिरादित्य होईल...' अजित पवारांनी अशी बॅटिंग केली की विरोधकही हसून-हसून लोटपोट दरम्यान,  शिवजयंती निमित्त लहान मुलांनी, मुलींनी  तलवार बाजी, लाठी काठी, दांडपट्टा,  असे विविध कारनामे पाहावयास मिळाले. यावेळी सत्यजित तांबे, आमदार रमेश पाटील आणि  माजी आमदार नरेंद्र पवार यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नसल्यचं पाहायला मिळालं. सत्यजीत तांबे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. येत्या काही दिवसांत काँग्रेसचे बडे मंत्री याच कार्यक्रमासाठी येणार आसल्याने  भाजपला किती मोठे खिंडार पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Published by:Akshay Shitole
First published: