नारायण राणेंच्या 'त्या' विधानावर भाजपने झटकला हात!

नारायण राणेंच्या 'त्या' विधानावर भाजपने झटकला हात!

सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त 145चा आकडा आणयचा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करतो. भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली होती.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर : 'सच परेशान हो सकता हे पराजित नहीं' अशा शब्दात भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काहींच्या हट्टामुळे राष्ट्रवदी राजवट लागल्याची टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देत आम्ही शिवसेनेशिवाय कोणत्याही पर्यायांवर विचार केला नाही पण आमच्या मित्रपक्षाने इतर पर्यायांचा विचार केला अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

दरम्यान, सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त 145चा आकडा आणयचा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करतो. भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली होती. यावर ती त्यांची वैयक्तीत प्रतिक्रिया असल्याचंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे

- राष्ट्रपती राजवट जनादेशाचा अपमान करणारी

- 24 तारखेपासून आजपर्यंत जनादेश स्पष्ट असताना सरकार स्थापन व्हावं ही भाजपची इच्छा होती

- आम्ही कोणत्याही पर्यायाचा शोध घेतला नाही पण आमच्या मित्र पक्षाने इतर पर्यायांचा विचार केला

- कोणत्याही पक्षाने सराकर स्थापनेचा दावा केला नाही

- कोणत्याही पक्षाने राज्यपालांकडे आम्ही सरकार स्थापन करतो असा दावा केला नाही

- आम्हालाही 24 तासांपेक्षा जास्त वेळ देण्यात आली नाही

- सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका ही अप्रस्तुत झाली आहे. त्याचा आताच्या राजकीय घडामोडींशी कोणताही संबंध नाही

- मित्रांनी आकडा असल्याचं सांगून अपमान केला

- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अद्याप शिवसेनेला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं नाही

- काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक झाली पण त्यांनी शिवसेनेची भेट घेतली नाही. त्यामुळे भाजप वेट अॅन्ड वॉच या भूमिकेत असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 09:28 PM IST

ताज्या बातम्या