सिंचन घोटाळ्यातील क्लीन चिटबद्दल भाजप नेत्याने केलं अजितदादांचं अभिनंदन, नंतर डिलिट केलं ट्वीट

सिंचन घोटाळ्यातील क्लीन चिटबद्दल भाजप नेत्याने केलं अजितदादांचं अभिनंदन, नंतर डिलिट केलं ट्वीट

भाजप प्रवक्ते अवधुत वाघ यांनी अजित पवार यांचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एसीबीने मोठा दिलासा आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेली सिंचन प्रकल्पाच्या 32 पैकी 9 प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली आहेत. त्यानंतर भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अजित पवार यांचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं होतं.

सिंचन प्रकरणांची चौकशी बंद करण्याबाबतचे पत्रक ट्विटरवर शेअर करत 'अभिनंदन अजित पवारजी' असं म्हणत अवधूत वाघ यांनी अजित पवार यांचं अभिनंदन केलं होतं. मात्र नंतर काही क्षणांतच अवधूत वाघ यांनी हे ट्वीट डिलीट केलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजपला साथ देणं आणि त्यानंतर काही काळातच त्यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट मिळणं, या योगायोगाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

अजित पवार यांना मोठा दिलासा

बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेली सिंचन प्रकल्पाच्या 32 पैकी 9 प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी एका पत्रकाव्दारे दिले आहेत.

विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू आहे. या प्रकरणाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अवलोकन केले आहे. सदर उघड चौकशी/निविदा प्रकरणांबाबत, भविष्यात शासनाने काही नियम अथवा न्यायालयाने काही निर्देश अथवा आदेश पारीत केल्यास या निर्णयाला आधीन राहून आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशी सुरू करण्यात येईल, या अटीवर नस्तीबंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी सांगितले आहे.

कोणते आहेत हे सिंचन प्रकल्प...

-गोडेगाव लघु पाटबंधारे योजना, ता. मानोरा, जि.वाशिम.

-पाचपहूर लघु पाटबंधारे योजना जि. यवतमाळ.

-सापन नदी प्रकल्प, ता. अचलपूर, जि. अमरावती.

-पंढरी नदी प्रकल्प, ता. वरूड, जि. अमरावती.

- खडकपूर्णा प्रकल्प, ता. देऊळगाव, जि. बुलडाणा.

- कोहन लघु प्रकल्प, ता. नेर, जि. यवतमाळ.

- बेंबडा लघु प्रकल्प, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ.

- बेंबडा लघु प्रकल्प, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ.

- बेंबडा लघु प्रकल्प, (डेहणी उपसा) ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ.

बंद केलेल्या केसेसचा अजित पवारांशी काही संबंध नाही..

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेली सिंचन प्रकल्पाच्या 32 पैकी 9 प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली आहे. परंतु या प्रकल्पाशी अजित पवारांचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमवीर सिंग यांनी केला आहे.

दरम्यान, विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणी जनमंच सामजिक संस्थेने दाखल केलेली याचिका प्रलंबित होती. घोटाळ्याची चौकशी तातडीने पूर्ण करण्यात यावी आणि दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा दोन आठवड्यात प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले होते.

दरम्यान, विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा दोन आठवड्यात प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले होते. विदर्भातील सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देखील असल्याने संपूर्ण राज्याचे या प्रकरणाकडे लक्ष आहे. या प्रकरणी जनमंच सामजिक संस्थेने दाखल केलेली याचिका प्रलंबित होती. घोटाळ्याची चौकशी तातडीने पूर्ण करण्यात यावी आणि दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील अनेक कामांच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

काय आहे सिंचन घोटाळा ?

- सिंचन घोटाळ्यासाठी आघाडी सरकार व प्रामुख्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे हे कसे जबाबदार आहेत, हे फडणवीस, मुनगंटीवार यांनी सांगितले होते.

- गोसीखुर्द सिंचन प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा झाला असून त्याची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी याचिका दिवंगत अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांनी 2011 मध्ये केली होती.

-2012च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, 1999 ते 2009 या कालखंडात राज्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये 35 हजार कोटींची अनियमितता असल्याची बाब समोर आली.

-फेब्रुवारी 2012 मध्ये तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करून सिंचन विभागात गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले होते.

-2012 मध्ये जनमंच या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून राज्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून सीबीआय चौकशीची मागणी केली.

First published: November 25, 2019, 5:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading