युतीचं जमलं! पुढच्या 10 दिवसांत ठरणार जागावाटपाचा फॉर्म्युला

युतीचं जमलं! पुढच्या 10 दिवसांत ठरणार जागावाटपाचा फॉर्म्युला

विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये पुढच्या 10 दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी

मुंबई, 2 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये पुढच्या 10 दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

मागची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळी लढवली होती. त्यातल्या काही जागा भाजप आणि शिवसेनेच्या पारंपरिक जागा आहेत. पण काही जागांवरून भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी सुरू आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग झालं आहे. त्यामुळे पक्षांतर करून आलेल्या नेत्यांचं काय करायचं हाही प्रश्न या पक्षांसमोर आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईत होते. त्यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सोलापूरमध्ये सांगता झाली. त्यामुळेच आता जागावाटपावर जास्त लक्ष केंद्रित केलं जाईल, अशीही माहिती आहे.

अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दणका,अटकेची टांगती तलवार

विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. स्वबळावर लढलं तर भाजपला बहुमत मिळेलं असं काही सर्व्हेत स्पष्ट झाल्यानं भाजप स्वबळाची तयारी करत असल्याचंही बोललं जाऊ लागलं होतं.या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला. शिवसेना आणि भाजप यांची युती ठरली असून त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. मनोमिलन तेव्हाच झालं असून आता पुढे युती आणखी भक्कम कशी करायची तेच ठरवायचं आहे असंही ते म्हणाले होते.

===========================================================================================

Ganesh Chaturthi 2019: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिद्धिविनायकाच्या चरणी, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 02:10 PM IST

ताज्या बातम्या