मुख्यमंत्रिपद नव्हे तर शिवसेनेला द्यायच्या खात्यांवरून भाजपमध्येच गृहकलह

मुख्यमंत्रिपद नव्हे तर शिवसेनेला द्यायच्या खात्यांवरून भाजपमध्येच गृहकलह

शिवसेनेला सरकारमध्ये महत्त्वाची खाती हवी आहेत आणि त्यावरून भाजपमध्येच वाद सुरू झाल्याचं समोर आलंय. भाजप आणि शिवसेनेच्या वाटाघाटींना यश आलं नाही तर राज्यात सरकार कुणाचं आणि कसं येणार याबद्दल तिढा निर्माण झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेना महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठीचं बहुमत असूनही या दोन पक्षांमध्ये सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरत नाहीये.

शिवसेनेला सरकारमध्ये महत्त्वाची खाती हवी आहेत आणि त्यावरून भाजपमध्येच वाद सुरू झाल्याचं समोर आलंय. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, शिवसेनेला अर्थ आणि महसूल खातं द्यावं, असा सूर होता पण शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडून त्यांना ही खाती देऊ नये, असं काही नेत्यांचं म्हणणं आहे.

या खात्यांवरून वाद

शिवसेनेला गृहखातं किंवा नगरविकास खातं दिलं जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे मग महत्त्वाची ही दोन खाती उरतात. अर्थखातं आणि महसूल ही खाती शिवसेनेला द्यायला मंत्र्यांचा विरोध आहे, अशी माहिती आहे. भाजपमधल्या या सगळ्या वादामुळेच शिवसेना आणि भाजपमधली सत्तास्थापनेची चर्चा थांबली आहे. मागच्या सरकारमध्ये अर्थखातं हे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होतं आणि महसूल खातं चंद्रकांत पाटील यांच्याकडे होतं. गृहखातं आणि नगरविकास ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांकडे होती.

(हेही वाचा : राज्यात कुणाचं येणार सरकार? या आहेत सत्तास्थापनेच्या 6 शक्यता)

भाजप आणि शिवसेनेच्या वाटाघाटींना यश आलं नाही तर राज्यात सरकार कुणाचं आणि कसं येणार याबद्दल तिढा निर्माण झाला आहे. 5 किंवा 6 नोव्हेंबरला भाजपचा शपथविधी होईल, अशी शक्यता आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार, अशीही चर्चा आहे. त्यामुळेच भाजप आता शिवसेनेशिवाय सरकार बनवतं की वाटाघाटी यशस्वी होऊन महायुतीचं सरकार बनतं ते पाहावं लागेल. तसं झालं नाही तर सत्तास्थापनेच्या आणखीही शक्यता पडताळून पाहिल्या जातील, असं बोललं जातंय.

======================================================================================

VIDEO : 'नेत्यांना सुबुद्धी देवो' भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या...

First published: November 1, 2019, 9:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading