मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

युती 100 टक्के होणार पण 'या' मुद्द्यावरून भाजप सेनेला झुकवणार!

युती 100 टक्के होणार पण 'या' मुद्द्यावरून भाजप सेनेला झुकवणार!

लोकसभेमध्ये युतीसाठी 50-50 फॉर्म्युला वापरण्यात आला होता तोच विधानसभेवेळीही वापरण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि सेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं. त्यामुळे दोन्ही पक्षांचं पारडं जड आहे.

लोकसभेमध्ये युतीसाठी 50-50 फॉर्म्युला वापरण्यात आला होता तोच विधानसभेवेळीही वापरण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि सेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं. त्यामुळे दोन्ही पक्षांचं पारडं जड आहे.

लोकसभेमध्ये युतीसाठी 50-50 फॉर्म्युला वापरण्यात आला होता तोच विधानसभेवेळीही वापरण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि सेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं. त्यामुळे दोन्ही पक्षांचं पारडं जड आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar

मुंबई, 22 सप्टेंबर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष युतीच्या घोषणेकडे आहे. पण युतीतली ठिणगी अद्याप विझली नसल्याचं चित्र आहे. युती होणार हे 100 टक्के नक्की असलं तरी जागावाटपाबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना 126 जागांवर ठाम आहे तर भाजप 120 पैकी एकही जागा देण्यासाठी तयार नाही आहे. त्यामुळे शिवसेनेला कमी जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसभेमध्ये युतीसाठी 50-50 फॉर्म्युला वापरण्यात आला होता तोच विधानसभेवेळीही वापरण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि सेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं. त्यामुळे दोन्ही पक्षांचं पारडं जड आहे. असं असताना 50-50च्या फॉर्म्युल्याने दोन्ही पक्षांना अडचणी येतील. तर मोठा पक्ष म्हणून भाजप 120 जागेच्या वर एकही जागा शिवसेनेला देण्यासाठी तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना 120 जागांवर तर 168 जागांवर मित्रपक्षांसह भाजप निवडणूक लढेल असं समीकरण भाजपचं आहे. पण जर भाजपने विधानसभेत 145 जागा जिंकल्या त्यांना शिवसेनेला विश्वासात घेण्याची गरज लागणार नाही अशी भीती शिवसेनेची आहे. त्यामुळे ते 126 जागांवर ठाम असल्याचं सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज म्हणजेच रविवारी मुंबईत येणार आहेत. मात्र, आजच्या मुंबई दौऱ्यामध्ये युतीबाबत कोणताही निर्णय होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भेटीची शक्यता काहीशी मावळली आहे. तर संध्याकाळी चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. त्यालाही अमित शहा उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच शनिवारी भाजप मुख्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर, महासचिव अरुण सिंह आणि इतर नेते उपस्थित होते.

आर्थिक मंदीवरील विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी रणनीती तयार करण्यावर अमित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. देशाची आर्थिक स्थिती बिकट झाल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकते. विधानसभा निवडणुकीत या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्यास त्यांना काय उत्तर द्यायचं, याबाबत भाजपच्या बैठकीत विचारमंथन करण्यात येत आहे.

इतर बातम्या - आचारसंहिता लागू होताच मुंबई पोलिसांना सापडलं गभाड, दुकानातून 67 लाख जप्त!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision of India) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते.

इतर बातम्या - आता भाजपचा हा 'रम्या' पाजणार विरोधकांना डोस, पवारांवर म्हणाला...!

288 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना - 27 सप्टेंबर

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर

उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

इतर बातम्या - निवडणूक जाहीर होताच भाजप-सेना युतीला मोठा धक्का, काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

काय आहे हरियाणातील स्थिती?

हरियाणामध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. हरियाणात मागील निवडणुकीत 90 पैकी 47 जागांवर भाजपने विजय मिळवला होता आणि मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar)यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते.

VIDEO: मुंबईकरांनो वेळापत्रक पाहून बाहेर पडा! तीनही मार्गावर मेगाब्लॉक इतर टॉप 18 बातम्या

First published:

Tags: Bjp-shivsena, Cm devendra fadnavis, Maharashtra vidhan sabha, Uddhav thackeray, Vidhan sabha