या कारणांमुळे येणार नाहीत मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर!

या कारणांमुळे येणार नाहीत मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर!

तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर यावेत यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू होत्या.

  • Share this:

मुंबई 22 जानेवारी : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या म्हणजे बुधवारी 93वी जयंती आहे. या जयंती दिनानिमित्त मुंबईतल्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक बनवायला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने या स्मारकासाठी तब्बल 100 कोटींची तरदूत केली आहे. या स्मारकाचं निमित्त साधून भाजप आणि शिवसेनेतला दुरावा दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत होते.

या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्नही होत होता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत एकत्र येणार नाहीत हे आता स्पष्ट झालं.

असा होणार कार्यक्रम

या कार्यक्रमाला  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय आणि शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.विशेष म्हणजे एकेकाळी या वास्तूमध्ये वास्तव्य केलेले शिवसेनेचे सगळे माजी महापौरही उपस्थित राहणार आहेत. तर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे काही प्रमुख नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बुधवारी सकाळी 11.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

दादरमधल्या प्रशस्त आणि ऐतिहासिक महापौर बंगल्यात बाळासाहेबांच हे स्मारक होणार आहे. बंगल्याच्या परिसरात जमिनीखाली हे स्मारक आकाराला येणार आहे. या बंगल्याला हेरीटेजचा दर्जा असल्याने स्मारकासाठी हा बंगला मिळणं कठिण काम होतं मात्र मुख्यमंत्र्यांनी खास लक्ष घालून स्मारकाचा मार्ग प्रशस्त केला.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. तर अजुनही शिवसेनेकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. उद्धव ठाकरे सातत्याने नरेंद्र मोदींना टार्गेट करत आहेत. सामनामधूनही दररोजच टीका केली जात आहे. त्यामुळे दोनही पक्षांमध्ये तणाव आहे.

हा तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर यावेत यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू होत्या. मात्र शिवसेना त्यासाठी फारसं अनुकूल नसल्याने पंतप्रधानांचा मुंबई दौरा काही होऊ शकला नाही.

First published: January 22, 2019, 7:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading