उद्या होणार युतीचा फैसला? उद्धव ठाकरे आणि मोदींकडे महाराष्ट्राचं लक्ष!

उद्या होणार युतीचा फैसला? उद्धव ठाकरे आणि मोदींकडे महाराष्ट्राचं लक्ष!

तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर यावेत यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू आहेत.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 22 जानेवारी : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या म्हणजे बुधवारी 93वी जयंती आहे. या जयंती दिनानिमित्त मुंबईतल्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक बनवायला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने या स्मारकासाठी तब्बल 100 कोटींची तरदूत केली आहे. या स्मारकाचं निमित्त साधून भाजप आणि शिवसेनेतला दुरावा दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.

या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्नही होत आहे. दादरमधल्या प्रशस्त आणि ऐतिहासिक महापौर बंगल्यात बाळासाहेबांच हे स्मारक होणार आहे. बंगल्याच्या परिसरात जमिनीखाली हे स्मारक आकाराला येणार आहे. या बंगल्याला हेरीटेजचा दर्जा असल्याने स्मारकासाठी हा बंगला मिळणं कठिण काम होतं मात्र मुख्यमंत्र्यांनी खास लक्ष घालून स्मारकाचा मार्ग प्रशस्त केला.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. तर अजुनही शिवसेनेकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. उद्धव ठाकरे सातत्याने नरेंद्र मोदींना टार्गेट करत आहेत. सामनामधूनही दररोजच टीका केली जात आहे. त्यामुळे दोनही पक्षांमध्ये तणाव आहे.

हा तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर यावेत यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू आहेत. सर्व गोष्टी सुरळीत झाल्या तर पंतप्रधान स्मारकाच्या कार्यक्रमाला येवू शकतात. पंतप्रधान आले तर युतीचं भविष्य ठरणार असून राज्यातल्या राजकारणातही मोठ्या घडामोडी घडणार आहे.

'मला विकू नका' : डोळ्यात पाणी आणणारा दुष्काळी भागातला Ground Report

First published: January 22, 2019, 1:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading