मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'युती'च्या 35 वर्षातल्या प्रवासातले 10 महत्त्वाचे टर्निंग पॉईंट्स

'युती'च्या 35 वर्षातल्या प्रवासातले 10 महत्त्वाचे टर्निंग पॉईंट्स

भाजपचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी युतीच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका निभावली. युतीच्या भांडणात बाळासाहेबांचा शब्द अंतिम होता.

भाजपचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी युतीच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका निभावली. युतीच्या भांडणात बाळासाहेबांचा शब्द अंतिम होता.

भाजपचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी युतीच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका निभावली. युतीच्या भांडणात बाळासाहेबांचा शब्द अंतिम होता.

मुंबई 18 फेब्रुवारी : भारताच्या राजकारणात ज्या मोजक्या दोन राजकीय पक्षांची दीर्घकाळ मैत्री राहिली त्यात भाजप आणि शिवसेनेचा उल्लेख करावा लागेल. अकाली दल आणि भाजपची युतीही दीर्घकाळ कायम आहे. 2014 नंतरची चार वर्ष सोडली तर भाजप आणि शिवसेना 1984 पासून कायम सोबत राहिले.

हे आहेत युतीचे टर्निंग पाईंट्स

हिंदुत्व हा भाजप आणि शिवसेनेला जोडणारा महत्त्वाचा दुआ. शिवसेनेचे हिंदुत्व आक्रमक आणि जास्त भर भावनेच्या राजकारणावरचा. तर भाजपचं हिंदुत्व संघाच्या विचारांवर आधारीत असलेलं आहे. त्यामुळे हे दोनही पक्ष एकत्र आलेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा आणि अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांचा राष्ट्रीय राजकारणातला प्रभाव यामुळं युतीचं रसायन घट्ट होत गेलं.

भाजपचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी युतीच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका निभावली. जेव्हा केव्हा युतीत कुरबूर व्हायची तेव्हा प्रमोद महाजन थेट मातोश्रीवर जावून बाळासाहेबांना भेटायचे आणि हट्ट धरायचे. युतीत बाळासाहेबांची भूमिका कायम वडिलकीच्या नात्याची होती.

शिवसेना आणि भाजप यांची सर्वात पहिल्यांदा युती ही 1984 च्या लोकसभा निवडणुकीत झाली होती. भाजपच्या कमळ या चिन्हावर शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक यांनी निवडणुक लढवली होती. पण युतीला पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यावेळी शिवसेनेशी युती केल्यानेच हा पराभव झाल्याची टीका भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. त्यामुळे विधानसभेत युती न करण्याचा निर्णय भाजपने घेतला. भिवंडी येथे 1984 मध्ये दंगल झाली आणि शिवसेनेने मराठीचा मुद्दा काहीसा बाजूला ठेवून पहिल्यांदा हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला.

त्याचवेळी भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनीही ‘अब हिंदू मार नही खायेगा’, अशी भूमिका घेतली आणि हिंदुत्वाच्या आधारावर या दोन पक्षांची युती झाली. त्यानंतर 1989 मध्ये झालेली भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ऐतिहासिक ठरली. या बैठकीत भाजपने दोन महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब केलं. त्यापैकी एक निर्णय होता. महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करण्याचा.

चार पाच वर्षांच्या एकत्रित काम करण्याच्या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाला. आणि 1995मध्ये युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं. बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं. शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच युतीचं सरकार आलं.

स्वतंत्र विदर्भ, मुंबईत येणारे लोंढे अशा अनेक प्रश्नावर भाजप आणि शिवसेनेत मतभेद होते. मात्र ते कधीच विकोपाला गेले नाहीत. अशा वेळी बाळासाहेबांचा शब्द हा अंतिम असायचा आणि भाजपचे नेतेही त्याचा मान ठेवायचे.

राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' हा पक्ष स्थापन केला. बाळासाहेबांना हा मोठा धक्का होता. शिवसेनेला मोठं खिंडार पडेल असं बोललं जाऊ लागल. बाळासाहेबांच्या निधनानंतर भाजप राज ठाकरेंना जवळ करेल का अशीही शक्यता व्यक्त केली जाऊ लागली मात्र युती कायम राहिली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मात्र परिस्थिती बदलली. नरेंद्र मोदींच्या करिष्म्याने भाजपची ताकद वाढली. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जास्त जागांची मागणी केली. तर शिवसेना जुन्याच भूमिकेवर कायम राहिली. त्यामुळे 25 वर्षांची युती तुटली आणि दोनही पक्ष वेगळे लढले. भाजपने सत्ता स्थापन केली. नंतर शिवसेनेने पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केली. भाजपवर हल्लाबोल केला. मात्र बदलती परिस्थिती लक्षात घेऊन दोनही पक्षा आता पुन्हा एकत्र आले आहेत.

VIDEO: युतीवर अमित शहांची पत्रकार परिषद UNCUT

First published:

Tags: Amit Shah, BJP, Devendra Fadanvis, Election2019, Maharashtra politics, Narendra modi, Shivsena, Uddhav Thackery, अमित शहा, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, भाजप, शिवसेना