मुंबई 17 जुलै : भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आज आपली भूमिका स्पष्ट केली. भाजप आणि शिवसेनेत135 /135 असं जागावाटप असलं तरी घटक पक्षांना जागा द्यावा लागतील. 'युती'चं जागावाटप हळूहळू उलगडत जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, मी परिपूर्ण आहे असं नाही. उपलब्ध असलेल्यांपैकी मी एक आहे, मी पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री झालंच पाहिजे असं काही नाही. मी कोरं पाकीट आहे, पक्षाचे नेते जो पत्ता पाकिटावर टाकतील तेथे तेथे मी जाईल. निवडणूक ही प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांची संयुक्त जबाबदारी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
महाराष्ट्रातल्या धरणफुटीची नरेंद्र मोदींनी घेतली दखल, हा घेतला मोठा निर्णय
बारामती जिंकणं अशक्य
चंद्रकांत दादांनी बारामतीला थेट आव्हान दिलं होतं त्यामुळे त्यांना त्यावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, आज बारामती विधानसभा जागा जिंकणं अशक्य आहे. यापुढच्या काळात बारामतीचं घर अधिक मजबूत करणार आहे. 2024 ची निवडणूक ही बारामतीसाठी असेल. EVM घोटाळा असता तर बारामती जिंकलो असतो असंही ते म्हणाले. ज्यांना EVM मशिन्सबाबत तक्रार करायची असेल त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावं असा सल्लाही त्यांनी दिला.
न विचारता बिस्किट खाल्ल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला वायरने बेदम मारहाण
तर भाजपनेही मोर्चा काढावा
शिवसेनेनेच नव्हे तर भाजपने देखील मोर्चा काढला पाहिजे. जो प्रश्न असेल त्या ठिकाणी सरकार जवळ उत्तर मागितलं पाहिजे. 2300कोटी प्रीमियम भरलं असता 3200 शे कोटी विमा भरपाई मिळाली आहे.नवीन विमा पॉलिसी कशी असावी यावर चर्चा सरकार निर्णय घेईल असंही ते त्यांनी सांगितलं.