बुलडाणा, 19 एप्रिल : बुलडाण्यात शिवसेना (Shivsena)आणि भाजपमध्ये (BJP) वाद आता शिगेला पोहोचला आहे. भाजप आमदार संजय कुटे (BJP MLA Sanjay kute) यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संजय कुटे यांनी हा हल्ला सेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या समर्थकांनीच केल्याचा आरोप केला आहे.
'मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले असते,' अशा प्रकारचं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यानंतर बुलडाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चांगलाच पेटला होता.
इस्रायलनं Mask वरील निर्बंध उठवले, पहिल्यासारखं सुरु झालं सर्वांचं आयुष्य
आज भाजपचे आमदार संजय कुटे हे निषेध करण्यासाठी बुलडाण्यात आले होते. पण, अज्ञात व्यक्तींनी कुटे यांच्या गाडीवर हल्ला चढवला आणि गाडीच्या काचा फोडल्यात. या घटनेनंतर संतप्त झालेले कुटे यांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आहे. संजय गायकवाड यांच्याच समर्थकांनी आपल्या गाडीच्या काचा फोडल्या असल्याचा आरोप कुटे यांनी केला आहे.
माझ्या गाडीवर बुलढाणा येथे संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला आता मी संजय गायकवाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी बुलढाणा शहर सोडणार नाही, मी परत बुलढाणा शहरात येतोय हिम्मत असेल मला अडवून दाखवावे.
— Dr.Sanjay Kute- डॉ.संजय कुटे (@DrSanjayKute) April 19, 2021
जोपर्यंत संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी बुलडाण्यातून बाहेर पडणार नाही, असा पवित्रात कुटे यांनी घेतली आहे.
IPL 2021 : ...तोपर्यत मुंबईचा पराभव अशक्य, सेहवागची भविष्यवाणी
रविवारीही माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. शिवसेना नेते विजयराज शिंदे यांच्या सहित तीन ते चार भाजप कार्यकर्त्यांवर शिवसैनिकानी हल्ला चढवला होता. तेव्हा धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष तथा आमदारपुत्र कुणाल गायकवाड यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही गटात पकडापकडी झाली. शिंदे यांना खाली पाडून त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप करीत आहे.
पोलिसांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही गटाना वेगळे करण्यात आले. भाजप नेते योगेंद्र गोडे तथा विजयाताई राठी, प्रभाकर बारे, सोनू बाहेकर, करण बेंडवाल तसंच अनेक भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.