मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सिंधुदुर्गात भाजप-सेना वाद पेटला, 'सेनेचा खासदार दलाली करतो', राणेंचा घणाघात

सिंधुदुर्गात भाजप-सेना वाद पेटला, 'सेनेचा खासदार दलाली करतो', राणेंचा घणाघात

'हे सरकार हिवाळी अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेचे नाही. आजारी मुख्यमंत्र्यांप्रमाणे हे सरकार सुद्धा आजारी आहे

'हे सरकार हिवाळी अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेचे नाही. आजारी मुख्यमंत्र्यांप्रमाणे हे सरकार सुद्धा आजारी आहे

'हे सरकार हिवाळी अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेचे नाही. आजारी मुख्यमंत्र्यांप्रमाणे हे सरकार सुद्धा आजारी आहे

  • Published by:  sachin Salve

सिंधुदुर्ग, 16 नोव्हेंबर : सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयावरून (Medical College at Sindhudurg) सध्या राजकीय कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर  केंद्रीय मंत्री नारायण राणे (naryan rane) यांनी आपण या वैद्यकीय महाविद्यालयात खोडा आणला नसल्याचा दावा केला. तसंच, विनायक राऊत हेच दलाली करत फिरतोय, असा पलटवार राणेंनी केला.

'हे सरकार हिवाळी अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेचे नाही. आजारी मुख्यमंत्र्यांप्रमाणे हे सरकार सुद्धा आजारी आहे. मला कुठल्याही कामात खोडा घालण्याची सवय नाही. मी कोणत्याही विकासाचे काम असेल, शैक्षणिक आरोग्याचे काम असेल मी असं काम करत नाही, मी कधीही खोडा घालणार नाही. वैद्यकीय महाविद्यालयाला काय गोष्टी लागतात आधी त्याची पुर्तता करा आणि मग बोला, असा टोला राणेंनी विनायक राऊत यांना लगावला.

देशाला मिळणार पहिला समलिंगी न्यायाधीश? नियुक्तीला 4 वेळा झाला होता विरोध

तसंच, खासदार विनायक राऊत यांना काही काम उरली नाही. सगळीकडे दलाली करत फिरत आहे, त्याला काहीही काम नाही,  असं म्हणत नारायण राणेंनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली.

तर दुसरीकडे, वैद्यकीय महाविद्याला विरोधात आपण  मंत्र्यांकडे पुन्हा एकदा तक्रार देणार आहोत. सिंधुदुर्गातील महाविद्यालयाची सर्व तयारी सुसज्ज आहे. एमईआरपी अॅक्ट प्रमाणे शेवटचे अपील दोन दिवसात केलं जाईल आणि त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या संदर्भातील तक्रार सुद्धा केली जाईल, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली.

'बाजी प्रभूंना गमवल्यानंतर राजांना काय वाटले..', भूषणची अजिंक्यसाठी पोस्ट

तसंच, केंद्रीय आरोग्य विभागाची यंत्रणा कशी बोलते त्याच्या ऑडिओ क्लिप सुद्धा आपण सादर करणार असल्याचा इशाराही विनायक राऊत यांनी दिला आहे.

First published: