भाजपच्या उमेदवारा विरुद्ध जिंकलेल्या आमदाराने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, जाहीर केला पाठिंबा!

भाजपच्या उमेदवारा विरुद्ध जिंकलेल्या आमदाराने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, जाहीर केला पाठिंबा!

भाजपच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर : मीरा भाईंदर मतदारसंघातून विजयी झालेल्या अपक्ष उमेदवार गीता जैन यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गीता जैन यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर गीता जैन यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला.

मीरा भाईंदर मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवलेल्या गीता जैन यांनी मेहता यांना 15 हजारांनी पराभूत केलं. भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्याविरुद्ध गीता जैन यांनी विजय मिळवल्यानं पक्षाला एक प्रकारचा धक्काच बसला होता. स्थानिक पातळीवरील नेते गीता जैन यांचे समर्थन करत असताना भाजपने आमदार नरेंद्र मेहतांना पुन्हा तिकिट दिले होते.

निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपविरुद्ध जिंकल्यानंतर गीता जैन म्हणाल्या की, लोकांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. तसेच त्यांनी महाभारताचा दाखला देत सांगितलं की, या युद्धात मी एकटी द्रौपदी नव्हते तर या परिसरातील लोकही होते ज्यांना त्रास झाला. या त्रासातून मला वाचवण्यासाठी माझे समर्थक कृष्ण झाले असंही त्यांनी म्हटलं. मतदानानंतर गीता यांनी सर्वांचे आभार मानतानासुद्धा अशाच भावना व्यक्त केल्या.

भाजपने गीता जैन यांना उमेदवारी नाकारल्यानंतर स्थानिक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. स्थानिक मुद्यांना हात घालत गीता जैन यांनी लोकांना साद घातली होती. गीता जैन या मीरा भाईंदरमधून निवडून येणारी पहिली महिला आमदार ठरल्या आहेत. तसेच विजयानंतर आपण कमळाविरुद्ध नाही तर त्याच्याभोवतीने साचलेल्या दलदलीविरुद्ध आहे असंही म्हटलं होतं.

VIDEO : अमरावतीमध्ये तुफान राडा, रवी राणा-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमनेसामने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2019 07:00 PM IST

ताज्या बातम्या