रावसाहेब दानवे म्हणजे 'रॉबर्ट शेठ', काँग्रेस नेत्यानं दिली व्हिलनची उपमा

रावसाहेब दानवे म्हणजे 'रॉबर्ट शेठ', काँग्रेस नेत्यानं दिली व्हिलनची उपमा

'महाराष्ट्रातील सरकार पाडची गरज नाही. हे सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी सरकार आहे ते स्वत: एकमेकांच्या पायत पाय अडकवून पडेल.'

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार हे अमर-अकबर-अँथनीचं सरकार आहे. आम्हाला हे सरकार पाडायची गरजच नाही तर एकमेकांमध्ये पाय अडकून ते आपणच पडतील अशा खोचक शब्दात भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. याच टीकेला राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी खुमासदार शैलीत उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसनंही रावसाहेब दानवेंवर टीका करत त्यांना सिनेमातला व्हिलन ठरवलं आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी रावसाहेब दानवेंना फिल्मी स्टाईलनं उत्तर दिलं आहे. अमर-अकबर-अँथनी तिघंही मिळून रॉबर्ट शेठला पुरुन उरतील असा खोचक शब्दात टोला लगावला आहे. तर सचिन सावंत यांनी रावसाहेब दानवेंना रॉबर्ट शेठची उपमा दिली आहे. यावरून ट्वीटर वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुमासदार शैलीत रावसाहेब दानवेंना उत्तर दिलं होतं.

हे वाचा-महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह 69 जणांना 'क्लीन चिट'

महाराष्ट्रातील सरकार पाडची गरज नाही. हे सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी सरकार आहे ते स्वत: एकमेकांच्या पायत पाय अडकवून पडेल. रावसाहेब दानवेंनी शिवसेना-ऱाष्ट्रवादी-काँग्रेसला अमर-अकबर अँथनीची उपमा देत टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख म्हणाले, 'महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण - होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी !'

Published by: Kranti Kanetkar
First published: October 8, 2020, 12:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या