विधानसभेच्या एण्ट्री आधीच राज ठाकरे भाजपच्या टार्गेटवर, 'कोहिनूर मिल'वरून जहरी टीका

विधानसभेच्या एण्ट्री आधीच राज ठाकरे भाजपच्या टार्गेटवर, 'कोहिनूर मिल'वरून जहरी टीका

विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी आणि त्यांना डोस पाजण्यासाठी भाजपने 'रम्याचे डोस' सुरू केले. भाजपच्या या रम्याने आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व विभागात मनसे आपले उमेदवार उभे करणार आहे. पण निवडणुकीच्या कामाला सुरुवात करण्याआधीच भाजपने राज ठाकरे यांना टार्गेट केलं आहे.निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच सगळ्याच पक्षात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी राजकीय पक्ष हे कायमच वेगवेगळे फंडे वापरत असतात. भाजपनेही सोशल मीडियाचा वापर करत राष्ट्रवादी-काँग्रेस आणि मनसे विरोधात मोठं कँपेन सुरू केलं आहे.

विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी आणि त्यांना डोस पाजण्यासाठी भाजपने 'रम्याचे डोस' सुरू केले. भाजपच्या या रम्याने आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या कोहिनूर मिल घोटाळ्याप्रकरणी त्यांना 'कोट्याधीश जादूगार' म्हणत टि्वट केलं आहे. कार्टून काढून त्याच्यातून राज ठाकरेवर भाजपने निशाणा साधला आहे. त्यामुळे याला आता मनसे कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

भाजपने ट्वीटमध्ये लिहलं की...

''अरे काल मी जादूचे प्रयोग बघितले. त्या जादुगाराने 2 रुपयाचं नाणं एका रिकाम्या डब्यात ठेवलं आणि दोन सेकंदात त्या नाण्याची 2000 रुपयाची नोट झालेली दिसली. आम्ही बघतच राहिलो रे!

छ्या...त्यात काय मोठं! ह्याला काय जादू म्हनतात होय...आपल्या कृष्णकुंजवरच्या सायबांनी एकही रुपया न टाकता 20 कोटी काढून दाखवले..'

खरंतर मनसे विधानसभा निवडणुकीची लढाई प्रत्यक्ष मैदानासोबतच सोशल मीडियातूनही लढली जाणार आहे. सोशल मीडियावर सत्ताधारी भाजपने मोठी ताकद लावली आहे. याला आता मनसेकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलं होतं. एका व्यंगचित्राच्या माध्यमातून मनसेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. 'राजभाषेच्या चाहुलीने सत्ताधारी थबकले, फक्त बातमीनेच थापाड्यांचे पाय लटलटले,' असं ट्वीट मनसेनं केलं होतं. त्यावर भाजपने राज ठाकरे यांना पलटवार केला आहे.

भाजप 'रम्याचे डोस' या सदराद्वारे विरोधकांचा प्रेमाने अर्थातच उपहासात्मक पद्धतीने समाचार घेतला जाणार आहे. गेल्या 15 वर्षात आघाडी सरकारचा कारभारावर टीका आणि निवडणुकीच्या धामधुमीत धमाल उत्तरं हा रम्या प्रेमाने देणार आहे. यासाठी भाजपकडून एक टीम तयार करण्यात आली असल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली आहे.

भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रम्या नावाचं एक पात्र तयार केलं आहे. हे पात्र फक्त सोशल मीडियावर असणार आहे. या रम्याद्वारे भाजप विरोधकांवर टीका करणार आहेत. यासंदर्भात भाजपने एक ट्वीटही केलं होतं.

'नमस्कार मंडळी,

तुम्हा-आम्हापैकी एक असलेला रमेश उर्फ 'रम्या' पुढील काही दिवस आघाडी सरकार व त्यांच्या मित्र पक्षांवर असलेल्या प्रेमाची उजळणी करणार आहे. आपल्या प्रेमाचे डोस पाजण्यासाठी '#रम्याचेडोस' च्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे.

नक्की वाचा!' असं भाजपने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. खरंतर विरोधक या रम्याला कसं उत्तर देणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

Special Report : मनसेचं ठरलं! 122 जागांसाठी अशी केली तयारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 12:57 PM IST

ताज्या बातम्या