Home /News /maharashtra /

शपधविधी वादानंतर उदयनराजे भोसले पुन्हा चर्चेत, लॉकडाऊनबद्दल केलं भाष्य

शपधविधी वादानंतर उदयनराजे भोसले पुन्हा चर्चेत, लॉकडाऊनबद्दल केलं भाष्य

राजकीय वातावरण तापलं असतानाच उदयनराजेंनी लॉकडाऊनबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे.

    किरण मोहिते, सातारा, 25 जुलै : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आले आहेत. राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेताना उदयनराजे यांनी जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली आणि वाद झाला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली. याबाबत राजकीय वातावरण तापलं असतानाच उदयनराजेंनी लॉकडाऊनबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे. लॉकडाउन करणे हा पर्याय नसल्याचं वक्तव्य नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. त्यासोबतच त्यांनी दिल्लीत लॉकडाऊन नाही आणि इथेच का लॉकडाऊन असाही प्रतिसवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाविरुद्ध लढताना प्रशासनाला वारंवार लॉकडाऊनच्या मार्गाचा अवलं करावा लागत असतानाच उदयनराजे यांनी मात्र लॉकडाऊनच्या निर्णयावर टीका केली आहे. लॉकडाऊनबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? ‘पुनश्च हरिओम’ म्हणतो किंवा ‘मिशन बिगिन अगेन.’ ते करताना नीट विषय समजून घ्यायला हवा की लॉकडाऊन केलेला आहेच. लॉकडाऊन आहेच, पण आपण एक एक गोष्ट सोडवत चाललेलो आहोत. हळूहळू एक एक गोष्ट बाहेर काढतोय. नाहीतर काय होईल लॉकडाऊन वन, लॉकडाऊन टू आणि अनलॉक टू या गोष्टीत अडकून पडू. तुम्ही घाईघाईने लॉकडाऊन केला तर ते चूक आहे. घाईघाईने लॉकडाऊन उठवला तर तेही चूक आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Lockdown, Udayan raje bhosle

    पुढील बातम्या