मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धुळे-नंदुरबार बँक अध्यक्ष निवडणुकीत राजवर्धन कदमबांडे चौथ्यांदा विजयी

धुळे-नंदुरबार बँक अध्यक्ष निवडणुकीत राजवर्धन कदमबांडे चौथ्यांदा विजयी

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Dhule-Nandurbar District Co-operative Bank) अध्यक्षपदी माजी आमदार भाजपचे राजवर्धन कदमबांडे (Rajvardhan Kadambande) यांची सलग चौथ्यांदा निवड झाली आहे.

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Dhule-Nandurbar District Co-operative Bank) अध्यक्षपदी माजी आमदार भाजपचे राजवर्धन कदमबांडे (Rajvardhan Kadambande) यांची सलग चौथ्यांदा निवड झाली आहे.

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Dhule-Nandurbar District Co-operative Bank) अध्यक्षपदी माजी आमदार भाजपचे राजवर्धन कदमबांडे (Rajvardhan Kadambande) यांची सलग चौथ्यांदा निवड झाली आहे.

धुळे, 1 डिसेंबर : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Dhule-Nandurbar District Co-operative Bank) अध्यक्षपदी माजी आमदार भाजपचे राजवर्धन कदमबांडे (Rajvardhan Kadambande) यांची सलग चौथ्यांदा निवड झाली आहे. तसेच उपाध्यक्षपदी नंदुरबारचे दीपक पाटील (Deepak Patil) यांची निवड झालीय. त्यामुळे जिल्हा बँकेवर आमदार अमरीश पटेल यांचं वर्चस्व कायम राहिले असून भाजपचे प्राबल्य असलेल्या गटाने पुन्हा एकदा बँकेवर सत्ता काबीज केली आहे.

...त्यामुळे निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही

धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी 17 सदस्यांनी मतदान केले. अध्यक्षपदासाठी राजवर्धन कदमबांडे आणि प्राध्यापक शरद पाटील निवडणूक रिंगणात होते. यात कदमबांडे यांनी बाजी मारली तर उपाध्यक्षपदासाठी नंदुरबार जिल्ह्यातील आमशा पाडवी आणि दीपक पाटील निवडणूक रिंगणात होते. यात पाटील यांनी बाजी मारली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, परंतु धुळे व नंदुरबार मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभाजन करण्याच्या मुद्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मुद्दा बारगळला आणि अखेर निवडणूक प्रक्रिया पार पडली.

हेही वाचा : परभणीत जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन पेट्रोल पंप सील, कारण...

संघर्ष पॅनलच्या उमेदवारांचा पराभव

या झालेल्या निवडणुकीत संघर्ष पॅनलच्या वतीने अध्यक्षपदासाठी शरद पाटील आणि उपाध्यक्ष पदासाठी आमशा पाडवी यांनी अर्ज दाखल केला होता. यावेळी झालेल्या मतदानात राजवर्धन कदमबांडे यांना 12 तर शरद पाटील यांना 5 मते मिळाली. तर उपाध्यक्षपदासाठी दीपक पाटील यांना 12 तर आमशा पाडवी यांना 5 मते मिळाली. त्यामुळे संघर्ष पॅनलच्या शरद पाटील व आमशा पाडवी यांचा पराभव झाला आहे. मतदारांनी पुन्हा एकदा राजवर्धन कदमबांडे यांच्यावर विश्वास दाखवल्याने सलग चौथ्यांदा अद्यक्षपदी कदमबांडे यांची निवड झाली.

हेही वाचा : "मी अनिल देशमुखांना कधी भेटलो ते मला आठवत नाही" : सचिन वाझेचा अजब दावा

जळगाव नंतर चर्चेत असलेल्या धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सुरुवातीपासूनच धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. अखेर भाजपचे प्राबल्य असलेल्या सर्वपक्षीय शेतकरी पॅनलच्या गटाची निवड झाल्यानंतर बँकेच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्यावर अनेक मान्यवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केला.

आमदार अमरीश पटेल गटाचे वर्चस्‍व कायम

बँकेच्‍या अध्यक्षपदासाठी माजी आमदार भाजपचे राजवर्धन कदमबांडे यांना 12 मत मिळाले. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला. तर उपाध्यक्ष पदासाठी दीपक पाटील यांना देखील 12 मत मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित झाला आहे. गेल्या वीस वर्षांपासून या बँकेवर माजी मंत्री आमदार अमरिश पटेल यांच्या गटाचे वर्चस्व कायम राहिले असुन पुन्हा सत्ता काबीज करत आमदार पटेल यांनी  सलग चौथ्यांदा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

First published: