मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sindhudurg District Bank Election Result : गड आला पण सिंह गेला, पराभवानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा फोन स्विच ऑफ

Sindhudurg District Bank Election Result : गड आला पण सिंह गेला, पराभवानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा फोन स्विच ऑफ

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुशांत नाईक (Sushant Naik) यांच्यात अटीतटीची लढत झाली. पण अखेर राजन तेली यांचा 15 मतांनी पराभव झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुशांत नाईक (Sushant Naik) यांच्यात अटीतटीची लढत झाली. पण अखेर राजन तेली यांचा 15 मतांनी पराभव झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुशांत नाईक (Sushant Naik) यांच्यात अटीतटीची लढत झाली. पण अखेर राजन तेली यांचा 15 मतांनी पराभव झाला.

तुषार रुपनवर, प्रतिनिधी

सिंधुदुर्ग, 31 डिसेंबर : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल (Sindhudurg District Bank Election Result) अखेर समोर आला आहे. या निवडणुकीदरम्यान शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला. शिवसेना आणि भाजप समर्थक आमनेसामने आले. अखेर या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागांवर यश आलं आहे. 19 जागांच्या या निवडणुकीत भाजपला 11 जागांवर यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीला आठ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांचा मात्र पराभव झाला आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या निकालामुळे राजन तेली नाराज झाले आहेत. त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण त्यांनी आपला फोन स्विच ऑफ केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचे राजन तेली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुशांत नाईक यांच्या अटीतटीची लढत झाली. पण अखेर राजन तेली यांचा 15 मतांनी पराभव झाला. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे भाऊ सुशांत नाईक यांचा विजय झाला. त्यांना 78 मतं मिळाली तर राजन तेली यांना 63 मतांवर समाधान मानावं लागलं.

पक्षश्रेष्ठींकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु

या निवडणुकीत भाजपला आपलं वर्चस्व मिळवण्यात यश आलं असलं तरी राजन तेली यांचा पराभव झाला आहे. या पराभवाने नाराज झालेले राजन तेली यांनी सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षश्रेष्ठींकडून अद्यापही राजन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र राजन तेली यांचा फोन स्विच ॲाफ असल्यामुळे पक्षश्रेष्ठींना राजन तेली यांच्या बरोबर संपर्क करता येत नाहीय.

हेही वाचा : 'अक्कल असलेल्यांच्या हाती जिल्हा बँक', निवडणुकीत भरघोस विजयानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया

'दिल्लीपर्यंत आमचं सरकार, राजनला वर्णी लावणार'

दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना राजन तेली यांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. "राजन तेली यांनी वरिष्ठांकडे राजीनामा दिलेला असेल. त्याबाबतचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. ही काही शिवसेना नाही. ते (शिवसेना) कायद्याचा वापर करुन जिंकण्याचा प्रयत्न करत होते. नितेश राणेंचे जामीन अर्जावर चार-चार दिवस सुनावणी चालते", अशा शब्दांत राणेंनी उद्विग्णता बोलून दाखवली. तसेच "गड आला पण सिंह गेला का ते आम्ही पाहू. गड न जाऊ देता सिंह सगळेच जिंकतो. आता आम्ही सत्ताही जिंकली आहे. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे राजनला वर्णी लावणार. त्याचा काही प्रश्न येत नाही",  अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली.

हेही वाचा : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व, नॉट रिचेबल असलेल्या नितेश राणेंनी Facebook पोस्ट करत म्हटलं 'गाडलाच'

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक निकाल :

सिद्धीविनायक सहकार पॅनल X सहकार समृद्धी पॅनल

भाजप X महाविकास आघाडी

1 राजन कृष्णा तेली 63 X सुशांत श्रीधर नाईक 78 ( विजयी )

2 अतुल सुधाकर काळसेकर 44 ( विजयी ) X सुरेश यशवंत दळवी 26

3 गजानन सुमंत गावडे 110 ( विजयी ) X लक्ष्मण आनंद आंगणे 85

4 महेश रमेश सारंग 33 ( विजयी ) X मधुसुदन केशव गावडे 27

5 संदिप उर्फ बाबा मधुकर परब 68 ( विजयी ) X विनोद रामचंद्र मर्गज 54

6 समीर रमाकांत सावंत 110 ( विजयी ) X विकास भालचंद्र सावंत 85

7 मनीष प्रकाश दळवी 13 ( विजयी ) X विलास प्रभाकर गावडे 8

8 गुरूनाथ शंकर पेडणेकर 16 X विद्याधर रविंद्रनाथ परब 17 ( विजयी )

9 प्रकाश सखाराम गवस 5 X गणपत दत्ताराम देसाई 7 ( विजयी )

10 विठ्ठल दत्ताराम देसाई ( विजयी ) X सतीश जगन्नाथ सावंत

11 प्रकाश जगन्नाथ मोर्ये 15 X विद्याप्रसाद दयानंद बांदेकर 20 ( विजयी )

12 प्रकाश विष्णू बोडस 19 ( विजयी ) X अविनाश मनोहर माणगांवकर 17

13 कमलाकांत उर्फ बाळू धर्माजी कुबल 11 X व्हिक्टर फ्रान्सिस डान्टस 19 ( विजयी )

14 दिलीप मोहन रावराणे 11 ( विजयी ) X दिगंबर श्रीधर पाटील 9

15 अस्मिता दत्तात्रय बांदेकर 459 ( विजयी ) X अनारोजीन जॉन लोबो 457

16 प्रज्ञा प्रदिप ठवण 480 X निता रणजितसिंग राणे 503 ( विजयी )

17 सुरेश ज्ञानदेव चौकेकर 458 X आत्माराम सोमा ओटवणेकर 506 ( विजयी )

18 रविंद्र मनोहर मडगांवकर 487 ( विजयी ) X मनिष मधुकर पारकर 484

19 गुलाबराव शांताराम चव्हाण 451 X मेघनाद गणपत धुरी 517 ( विजयी )

First published:
top videos