कट्टर विरोधक भिडणार, थोरातांना होम पीचवर चितपट करण्यासाठी विखेंचा 'मास्टर स्ट्रोक'

कट्टर विरोधक भिडणार, थोरातांना होम पीचवर चितपट करण्यासाठी विखेंचा 'मास्टर स्ट्रोक'

आगामी विधानसभा निवडणुकीत थोरातांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी विखे आपली सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचं दिसत आहे.

  • Share this:

प्रशांत बाग, संगमनेर, 15 ऑगस्ट : आगामी विधानसभा निवडणुकीआधी नगर जिल्ह्यातील ताकदवार नेते अशी ओळख असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली आहे. कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना घरच्या मैदानावर पराभूत करण्यासाठी विखेंनी प्रयत्न सुरू केले आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांचे आणि राजकीय गुरू असलेल्या बाळासाहेब वाघ यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. तसंच यावेळी विखेंनी नतमस्तक होऊन बाळासाहेब वाघ यांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत थोरातांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी विखे आपली सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचं दिसत आहे.

थोरातांच्या मतदारसंघात विखेंचा 'संपर्क'

एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या विखे आणि थोरात यांच्यात आता राजकीय संघर्ष आणखी वाढला आहे. काँग्रेसला उभारी देण्यासाठी थोरातांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आल्यानंतर आता भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांना शह देण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातच संपर्क कार्यालय सुरू केलं आहे. तसंच थोरात विरोधकांची मोट बांधली आहे.

काँग्रेसमध्ये असतानाही या दोघांचे राजकीय युद्ध सुरू असल्याचं अनेकदा बघायला मिळालं. मात्र आता विखेंच्या भाजपप्रवेशानंतर हे युद्ध आणखी तीव्र झालं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण कुणाला शह देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दौंड : कुरकुंभ MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 11:49 AM IST

ताज्या बातम्या