Home /News /maharashtra /

आम्ही पाठीशी, भाजपच्या मोठ्या नेत्याने घेतली इंदुरीकर महाराजांची भेट!

आम्ही पाठीशी, भाजपच्या मोठ्या नेत्याने घेतली इंदुरीकर महाराजांची भेट!

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात गेला असून मुख्यमंत्री दबावाखाली काम करत आहेत. त्यांना स्वतः काही निर्णय घेता येत नाही'

संगमनेर, 25 जुलै : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अडचणीत सापडले आहे. आज भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. विखे पाटील यांनी इंदुरीकर महाराज यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे नेते, भाजपा नेत्यांपाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज इंदुरीकरांची त्यांच्या ओझर गावातील निवासस्थानी भेट घेतली. इंदुरीकर महाराजांचे समाजप्रबोधनाचे मोठे काम असून त्यांनी आपले काम पुढेही अविरतपणे सुरू ठेवावे. समाज आणि माझे पाठबळ त्यांच्या पाठीशी असल्याचं विखे पाटलांनी म्हटलं आहे. बुलडाणा हादरलं,3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; फाशी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न यावेळी त्यांनी राज्य सरकारवर विखे पाटलांनी घणाघाती टीका केली आहे. ' आघाडी सरकारने राज्यातील शेतकरी आणि जनतेची फसवणूक केली असून राज्यातील सरकार फेकू सरकार आहे. दुधाचे दर वाढू नये ही मंत्र्याचीच भूमिका असून आपल्या दुधसंघातून मलीदा खाण्याचं काम सरकारमधील मंत्री करत आहेत.' असा आरोपही विखे पाटलांनी केला. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात गेला असून मुख्यमंत्री दबावाखाली काम करत आहेत. त्यांना स्वतः काही निर्णय घेता येत नसल्याची टीकाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तर राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले असून आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारवर टीका करत असल्याचं विखे पाटील म्हणाले. पावती फाडण्याइतकेही पत्नीजवळ नव्हते पैसे, रुग्णालयाबाहेरच पतीचा मृत्यू दरम्यान, काही दिवसांपूर्वी  भाजप आध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी इंदोरीकरांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. वारकरी सांप्रदायाची पताका ज्यांनी घराघरात पोहचवली त्या इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केल्ययानंतर हा विषय संपवायला हवा होता, असं आचार्य तुषार यावेळी म्हणाले. 'पुनश्च: हरिओम'च्या नावाखाली दारुच्या दुकानांसह सगळेच उद्योग सुरू केले. हरिला मात्र लॉक करून ठेवलं आहे, अशी आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. केंद्रानं मंदिरं उघडण्याचे निर्देश दिले. मात्र, महाराष्ट्रात अद्याप कोणतीही प्रकिया सुरू नाही, सर्व नियमावली पाळून मंदिर खुले करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही आचार्य तुषार यांनी केली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, Radhakrushana vikhe patil, राधाकृष्ण विखे पाटील, विखे पाटील

पुढील बातम्या