बाळासाहेब थोरातच करणार होते भाजपमध्ये प्रवेश, राधाकृष्ण विखेंचा मोठा गौप्यस्फोट

बाळासाहेब थोरातच करणार होते भाजपमध्ये प्रवेश, राधाकृष्ण विखेंचा मोठा गौप्यस्फोट

राज्यात तुम्हाला स्वत:चा मतदारसंघ सोडला तर कुठेही यश मिळवता आलं नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या काँग्रेस प्रवेशाची चिंता करू नका असंही विखे पाटील म्हणाले.

  • Share this:

अहमदनगर, 28 डिसेंबर : बाळासाहेब थोरात हे दोन वर्षाआधी भाजपमध्ये येण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. राजकीय फायद्यासाठी थोरातांनी पक्षाची फरपड केली आणि पक्ष दावणीला बांधला. भाजपमध्ये येण्यासाठी ते कोणत्या नेत्यांना भेटले हे मला सांगण्याची गरज नाही अशा शब्दात विखेंनी थोरातांवर घणाघाती टीका केली आहे. राज्यात तुम्हाला स्वत:चा मतदारसंघ सोडला तर कुठेही यश मिळवता आलं नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या काँग्रेस प्रवेशाची चिंता करू नका असंही विखे पाटील म्हणाले.

खरंतर अहमदनगरमध्ये सध्या बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे असा वाद पाहायला मिळत आहेत. त्यात भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नगर जिल्ह्यातील राजकारणात होणार संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यामुळे विखेंच्या घरवापसीची चर्चा सुरू झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला होता. त्यावर विखेंनी पलटवार केला आहे.

इतर बातम्या - कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक, 3 प्रवासी जागीच ठार तर 4 गंभीर जखमी

विखे पाटलांना बाळासाहेब थोरातांनी दिला धक्का

'जिथं गेला तिथं सुखाने नांदा,' असा टोला बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला होता. तसंच विखे पाटील यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांची भेट का घेतली, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काँग्रेसकडून मुंबईत रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान, काँग्रेस स्थापना दिनानिमित्त हॉल ऑगस्ट क्रांती मैदान येथे ध्वजारोहण करून ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापर्यंत भारत बचाओ - संविधान बचाओ फ्लॅग मार्च काढण्यात आला. यावेळेस काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी समर्थन कायद्याला पाठिंबा देणाऱ्या भाजपच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्याच ठिकाणी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिनानिमित्त मार्च काढण्यात आला.

इतर बातम्या - 'तुम्ही कामाशी काम ठेवा', लष्कर प्रमुखावर भडकले चिदंबरम

काँग्रेस प्रवेशाबद्दल विखे पाटलांचा खुलासा

पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का? असा प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखेंनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझी बदनामी करण्याची कुणीतरी सुपारी घेतली आहे अशी गंभीर टीका यावेळी विखेंनी केली.

'मी काँग्रेस पक्षात स्वगृही परतणार या बातम्या निराधार आहेत. अशा अफवा पसरवून कोणीतरी मला बदनाम करण्याची सुपारी घेतली' असल्याचं विखे म्हणाले आहेत. माझे सर्व पक्षातील नेत्यांशी संबंध आहेत. त्यामुळे मी सार्वजनिक जीवनात कुणाला भेटायचंही नाही का? राजकीय जीवनात आता कुणाशी संबधही ठेवायचे नाही का? असा संपप्त सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2019 07:57 PM IST

ताज्या बातम्या