कोकणातील 5 ते 6 आमदार लवकरच भाजपमध्ये, प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट

आघाडीतील नेमके कोणते आमदार भाजपच्या वाटेवर आहेत, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 12:22 PM IST

कोकणातील 5 ते 6 आमदार लवकरच भाजपमध्ये, प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट

मुंबई, 18 ऑगस्ट : ‘विरोधी पक्षातील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असून कोकणातील पाच ते सहा आमदारही भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीतील नेमके कोणते आमदार भाजपच्या वाटेवर आहेत, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

‘अनेक आमदारांना भाजपमध्ये यायचं आहे. पण पक्षात कोणाला घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं याचा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यामुळे लवकरच भाजपमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात इनकमिंग होईल,’ असं म्हणत कोकणातही काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे संकेत भाजपच्या प्रसाद लाड यांनी दिले आहेत.

‘विधानसभेत युती अभेद्य राहणार’

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सतत मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेली युती विधानसभा निवडणुकीआधी तुटेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र प्रसाद लाड यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. ‘विधानसभेसाठी सेना आणि भाजपमधील युती कायमच रहाणार असल्याचा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे.

आऊटगोईंग थांबता थांबेना, आघाडीतील नेते युतीच्या वाटेवर

Loading...

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बार्शीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांनी पक्षाच्या मुंबईतील बैठकीला दांडी मारली आहे. त्याचवेळी सोपल यांनी बार्शीत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यानंतर दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

VIDEO: केरळच्या पुरामध्ये 113 जणांचा मृत्यू, सकाळच्या टॉप 18 न्यूज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 12:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...