महाजनादेश यात्रेनंतर भाजप कार्यालयात पार्टी, पदाधिकाऱ्यांचा 'मुंगडा' डान्स

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा सध्या विदर्भात आहे. मुख्यमंत्री विदर्भात अनेक जिल्ह्यात महाजनादेश यात्रेद्वारे पक्षाचा प्रचार करत आहे. मात्र, अकोल्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या 'मुंगडा' डान्स चांगलाच चर्चेत आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 01:52 PM IST

महाजनादेश यात्रेनंतर भाजप कार्यालयात पार्टी, पदाधिकाऱ्यांचा 'मुंगडा' डान्स

अकोला, 6 ऑगस्ट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा सध्या विदर्भात आहे. मुख्यमंत्री विदर्भात अनेक जिल्ह्यात महाजनादेश यात्रेद्वारे पक्षाचा प्रचार करत आहे. मात्र, अकोल्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या 'मुंगडा' डान्स चांगलाच चर्चेत आला आहे. बैठकीनंतर भाजप कार्यालयात पार्टी झाली. त्यात पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मुंगडा गाण्यावर ठेका धरल्याचे बोलले जात आहे.

बार्शीटाकळीमध्ये महाजनादेश यात्रेसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर भाजप पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी 'मुंगडा' गाण्यावर ठेका धरला. महाजनादेश यात्रेसाठी सोमवारी (5 ऑगस्ट) अकोल्यातील बार्शीटाकळी इथल्या भाजप कार्यालयात बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप पदाधिकारी भाजप कार्यालयातच 'मुंगडा' गाण्यावर थिरकले. भाजप कार्यकर्त्यांचा 'मुंगडा'डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बार्शीटाकळीचे भाजपचे तालुकाध्यक्ष अविनाश महल्ले, विस्तारक गौवर्धन काकड, सरचिटणीस गणेश झळके, सरचिटणीस सुनील थोरात, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गजानन लुले आणि मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरिश पिंपळे यांचे स्वीय सहायक निलेश हांडे यांचा यात समावेश आहे. या प्रकारामुळे महाजनादेश यात्रेद्वारे 'पार्टी विथ डिफरन्स'चा दावा करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचे नवे रुप समोर आले आहे.

अकोल्यात पाच शेतकऱ्यांनी घेतला विषाचा घोट..

महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शासनाकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतजमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने बाळापूर तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी सोमवारी येथील अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात एका शेतकरी महिलेचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून शासनदरबारी लढा देत वाढीव मोबदल्याची मागणी करूनही शेतकऱ्यांनी लाभ मिळाला नाही. विष प्राशन केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मुरलीधर राऊत (42, शेळद), मदन हिवरकार (32, कान्हेरी गवळी), साजिद इक्बाल शे. मोहम्मद (30, बाळापूर), मो. अफजल गुलाम नबी (30, बाळापूर) आणि अर्चना टकले (30, बाळापूर) या शेतकऱ्यांची जमीन महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. अधिग्रहित झालेल्या जमिनीचा मोबदला इतर शेतकऱ्यांपेक्षा कमी मिळाला म्हणून उपरोक्त शेतकरी गत अनेक वर्षांपासून शासन दरबारी लढा देत आहेत. वाढीव मोबदला मिळावा, म्हणून त्यांनी २९ जुलै रोजीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आत्महत्येचा इशारा दिला होता.

Loading...

VIDEO: तो एक क्षण आणि थोडक्यात बचावले मुख्यमंत्री!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 01:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...