अंबरनाथ,7 मार्च:बदलापूरमध्ये भाजपच्या एका पदाधिकऱ्याने शिवसेनेच्या नगसेवकावर भंगार चोरीचा आरोप करत शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. भाजप, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नगरसेवक जयप्रकाश टांकसाळकर यांच्यावर भंगार चोरीचा आरोप केल्यानं निवडणूकपूर्वीच वातावरण तापले आहे.
भाजप बदलापूर शहर सचिटणीस सागर सावंत यांनी शिवसेना नगरसेवक जयप्रकाश टांकसाळकर यांना शिवीगाळ केली आहे. बदलापूर प्रभाग क्रमांक 13 मधील प्रबोधनकार ठाकरे उद्यान आहे. या उद्यानातील मोडकळीस आलेले खेळण्याचे लोखंडी साहित्य शनिवारी दुपारी एका ट्रकमध्ये भरून अंबरनाथच्या बुवापाडा येथे नेले जात असल्याची माहिती राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांना मिळाली. यावेळी बदलापूर पालिकेच्या परवानगीशिवाय या ट्रकमध्ये लाखो रुपयांचे भंगार घेऊन जात असून शिवसेनेचे नगरसेवक करत असल्याचा आरोप भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
हेही वाचा.. 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, असं आलं आईच्या लक्षात
भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हे भंगार इथून कोणी न्यायला सांगितले असे विचारले असता नगरसेवक जयप्रकाश टांकसाळकर यांचं नाव समोर आलं. हे सगळा गोंधळ सुरु असताना शिवसेना नगरसेवक जयप्रकाश टांकसाळकर त्याठिकाणी आले. त्यावेळी नगरसेवक टांकसाळकर आणि भाजप कार्यकर्ते आपापसात भिडले. त्यातच शिवसेना नगरसेवक जयप्रकाश टांकसाळकर यांच्यावर भंगार चोरीचा आरोप करून भाजप बदलापूर शहर सचिटणीस सागर सावंत यांनी शिवीगाळ केली आहे.
दरम्यान, आता या भंगार चोरीत शिवसेना नगसेवकाचा हात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, यात आपला काही संबंध नाही, असे नगरसेवक जयप्रकाश टांकसाळकर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा..जे फेसबुकला सापडलं नाही ते एका पुणेकराने शोधलं, मिळालं 40 लाखांचं बक्षीस