Home /News /maharashtra /

'स्वतःच स्वतःला शिकवते आहे... शून्यापासून सुरू केलं आहे....' पंकजा यांच्या नव्या 'छंदा'ची चर्चा

'स्वतःच स्वतःला शिकवते आहे... शून्यापासून सुरू केलं आहे....' पंकजा यांच्या नव्या 'छंदा'ची चर्चा

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी Twitter वर त्यांच्या नव्या छंदाविषयी पोस्ट केली आहे. त्यांनी आपण काढलेलं चित्र शेअर करताना लिहिलेल्या या शब्दांवरून मात्र वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

    मुंबई, 11 मे : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी Twitter वर त्यांच्या नव्या छंदाविषयी पोस्ट केली आहे. त्यांनी आपण काढलेलं चित्र शेअर करताना लिहिलेल्या शब्दांवरून मात्र वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर भावनिक ट्वीट केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता शून्यापासून सुरू केलं आहे म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय आहे, याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव नाही. याचा अर्थ त्यांना पक्षानं डावललं आहे. यामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांनी भावनिक ट्वीट केलं आहे. 'पण, वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही', असं पंकजा यांनी म्हटलं होतं. वाचा - उद्धव ठाकरे आणि मोदींच्या बैठकीनंतर संजय राऊत आक्रमक, केंद्र सरकारवर खोचक टीका आता सोमवारी संध्याकाळी पंकजा यांनी ट्वीट करत आपल्या नव्या छंदाविषयी माहिती दिली आहे. स्वतःच स्वतःला शिकवते आहे. असं त्यांनी चित्राबद्दल म्हटलं असलं, तरी याचा राजकीय अर्थ आहे का याची चर्चा होते आहे. 2019 लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रणजीत सिंह मोहिते यांच्यासह डॉ. अजित गोपचडे, प्रवीण दटके आणि गोपीचंद पडळकर यांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या बंडखोरांना चाप लावल्याचं स्पष्ट झालं आहे. देवेंद्र फडणवीसांचं वर्चस्व 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचं तिकीट कापत भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. भाजपने ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये लढली होती. त्यामुळे साहजिकच निवडणुकीतील प्रत्येक मोठ्या निर्णयाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी होती. त्याचवेळी दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्याने देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्या पक्षांतर्गत विरोधकांचा पत्ता कट केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा खडसे, तावडे, मुंडे आणि बावनकुळे यांना विधानपरिषद उमेदवारीपासूनही दूर ठेवल्याने पक्षात अजूनही फडणवीसांचं वर्चस्व असल्याचं बोललं जात आहे. Monsoon 2020 आला रे! या तारखेला देशात होणार आगमन, हवामान खात्याचा अंदाज
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: BJP, Pankaja munde

    पुढील बातम्या