परळीत शेतकऱ्यांवर अन्याय? पंकजा मुंडे समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने

परळीत शेतकऱ्यांवर अन्याय? पंकजा मुंडे समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने

मनसेचे कार्यकर्ते हे परळी शहरातील शिवाजी चौकामध्ये एकत्र झाले होते. तिथून पंकजा मुंडे यांच्या घराकडे जाताना पोलिसांनी त्यांना अडवले.

  • Share this:

बीड, 17 फेब्रुवारी: परळीत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. पंकजा मुंडे यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे या चेअरमन असलेल्या पनगेश्वर शुगर मिल्स या साखर कारखाण्याचे मागच्या वर्षाचे वैधानिक किमान मूल्य अर्थात एफआरपी शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यासोबतच ऊसतोड मुकादम नाही. त्यांचे पैसे मिळाले नाहीत. म्हणून मनसेने सोमवारी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी मनसेचे कार्यकर्ते हे परळी शहरातील शिवाजी चौकामध्ये एकत्र झाले होते. तिथून पंकजा मुंडे यांच्या घराकडे जाताना पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच्या ठिय्या मांडला. यावेळी पंकजा मुंडे यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी जमले आणि त्यांनीही 'पंकजा मुंडे जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच परीस्थितीवर नियंत्रण मिळवले.

वारकरी संप्रदाय संपवण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न

दरम्यान, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय संपवण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रसिध्द कीर्तनकार इंदुरीकर महाराजांना विरोध म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय संपवण्याचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा डाव असल्याची घणाघाती आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.

राम कुलकर्णी अंबेजोगाईत बोलत होते. धर्मनिरपेक्ष, पुरागामी विचाराचा आडून कीर्तन परंपरा धोक्यात आणण्याचा डाव काही लोक, शक्ती करत असून इंदुरीकर महाराज हे प्रबोधनकार आहेत. त्यांच्यामुळे अनेकांनी दारु सोडली तर आई-वडिलांची सेवा लोक करू लागले आहेत. इंदुरीकर महाराज जे बोलले त्याला धार्मिक ग्रंथाचा, गुरुचरित्राचा आधार असल्याचे राम कुलकर्णी म्हणाले, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सडकून टीका केली.

First published: February 17, 2020, 2:06 PM IST

ताज्या बातम्या