मुंबई, 15 ऑगस्ट : 'मी अगदी हृदयावर दगड ठेऊन टाळते. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद पोहचले. तुम्ही माझी रक्षा करणार, याचा विश्वास आहे आणि तुमच्या विश्वासाची रक्षा करणं माझे कर्तव्य आहे. राखी नाही बांधली तरी रक्षा हे बंधन आपल्यात सदैव आहेच,' असं म्हणत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'आज रक्षाबंधन. मी समजते माझे भाऊ मला खूप प्रेम करतात आणि ते मला राखी बांधण्याची इच्छा व्यक्त करतात. पण एकाला राखी बांधून दुसऱ्या भावाला टाळता येणार नाही. मग सर्वांना कसं समजावता येईल?' असं ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
आज रक्षाबंधन.. मी समजते माझे भाऊ मला खूप प्रेम करतात आणि ते मला राखी बांधण्याची इच्छा व्यक्त करतात पण एकाला राखी बांधून दुसऱ्या भावाला टाळता येणार नाही मग सर्वांना कसं समजावता येईल ?? जे पूर्वी पासून बांधतात असे एक दोन मानलेले भाऊ सोडले तर नवीन कोणा एकाला राखी बांधणं
मी अगदी हृदयावर दगड ठेऊन टाळते.. तुमचे प्रेम आशिर्वाद पोचले ..रक्षा तुम्ही माझी करणार याचा विश्वास आहे आणि तुमच्या विश्वासाची रक्षा करणं माझे कर्तव्य आहे ... राखी नाही बांधली तरी रक्षा हे बंधन आपल्यात सदैव आहेच !! #RakshaBandhanpic.twitter.com/AzBSqVrQTn
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधनाच्या भावनिक शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मुंडे यांनी नेमके कोणाला उद्देशून लिहीले आहे का, अशी चर्चासुरू झाली आहे. पंकजा मुंडे यांचे त्यांचे चुलत भाऊ आणि राष्ट्रवादीचे नेते असलेल्या धनंजय मुंडे यांच्यासोबत राजकीय मतभेद आहेत. मात्र असे मतभेद असले तरी बहिण-भावातील भावनिक स्नेह अद्यापही कायम असल्याचं यापूर्वी अनेकदा दिसून आलं आहे.
VIDEO : निवडणुका पुढे ढकलाव्यात? शरद पवार म्हणतात...