VIDEO: पंकजा मुंडेंची राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका, विरोधकांना मत न देण्याचं आवाहन

'ज्या राष्ट्रवादीचा जिल्हयात आमदार नाही, मराठवाड्यात एकही खासदार नाही, राज्यात सत्ता नाही त्या पक्षाच्या मागे जाताच कशाला? त्यांचे उमेदवार पडणारे आहेत. उगीच मत वाया घालवू नका'

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 01:27 PM IST

VIDEO: पंकजा मुंडेंची राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका, विरोधकांना मत न देण्याचं आवाहन

परळी (बीड),  10 सप्टेंबर : 'ज्या पक्षाला भविष्य नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीचा जिल्हयात अथवा मराठवाड्यात एकही आमदार, खासदार नाही त्यांच्या मागे जाताच कशाला?' असा प्रश्न करून महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे, विनाकारण मतं व्यर्थ घालू नका, असे राज्याच्या ग्रामविकास आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला आवाहन केलं आहे. 'राष्ट्रवादीतील लोक मला मतदान करणार आहेत. समोरचा माणूस निवडणुकीत पडला तरी आमदारच राहणार आहे. मग माझं कशाला नुकसान करता. परळीत दोघांना आमदार राहू द्या की' असं सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पुढे बोलताना, 'गेल्या 5 वर्षात मंत्री म्हणून काम करत असताना भरभरून विकासनिधी देण्याबरोबरच विवाह सोहळा, महा आरोग्य शिबीर, बचतगटांच्या माध्यमातून मी तुमची सेवा केली. भविष्यातही मीच मंत्री म्हणून तुमची सेवा करणार आहे.' असा विश्वास यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. 'ज्या पक्षाला भविष्य नाही, ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा जिल्हयात अथवा मराठवाड्यात एकही आमदार, खासदार नाही त्यांच्या मागे जाताच कशाला?' असा प्रश्न करून महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे.  विनाकारण मतं व्यर्थ घालू नका असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

इतर बातम्या - भाजप-सेनेच्या मेगाभरतीमुळे युतीत मोठा ट्विस्ट, असा असेल नवा फॉर्म्युला

परळी तालुक्यातील हाळम विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'मंत्री म्हणून काम करत असताना मी मतदारसंघाच्या विकासासाठी अतिशय तळमळीने काम केलं. केवळ रस्ते, नाल्या, इमारती बांधून थांबले नाही तर माणसं जोडण्याचं काम केलं. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, महा आरोग्य शिबीर, बचतगटांची चळवळ गतीमान करून महिलांना सशक्त केलं. एवढं केल्यावर तुम्ही मलाच साथ देणार असा मला विश्वास आहे.'

इतर बातम्या - दिराने केला वहिनी-पुतण्याचा खून; रात्रभर राहिला मृतदेहांसोबत

Loading...

'जनतेला गुण्या गोविंदाने राहू देणारा लोक प्रतिनिधी आज हवा आहे. भाजपचेच सरकार पुन्हा येणार आहे, यात कोणालाही शंका असण्याचं कारण नाही. पण ज्या राष्ट्रवादीचा जिल्हयात आमदार नाही, मराठवाड्यात एकही खासदार नाही, राज्यात सत्ता नाही त्या पक्षाच्या मागे जाताच कशाला? त्यांचे उमेदवार पडणारे आहेत. उगीच मत वाया घालवू नका. काँग्रेसची अवस्थाही तीच आहे. तुमच्या लेकीच्या पाठिशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यामुळे तुमची सेवा करतांना कुठेही कमी पडणार नाही' असंही त्या म्हणाल्या.

VIDEO: युतीच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना खासदार अनिल देसाईंची EXCLUSIVE माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 01:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...