BREAKING: पंढरपूर भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर यांचा कोरोनामुळे मृत्यू

BREAKING: पंढरपूर भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर यांचा कोरोनामुळे मृत्यू

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देखील त्यांचे काम सुरू होते. तीन वर्षापूर्वी त्यांची भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली होती.

  • Share this:

सोलापूर, 27 जुलै : कोरोनाने देशात थैमान घातले आहे. एकीकडे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत असताना, महाराष्ट्र राज्याला कोरोनाचा सगळ्यात जास्त फटका बसला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यानं अनेक नेतेमंडळीही गमवली लागली आहेत. यातच आज भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांचे कोरोनामुळे निधन झाले.

संजय वाईकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना वाखरी कोव्हिड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू असतानाच अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सोलापूरला दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. काही दिवसापूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना सुरुवातीस वाखरी येथील एम आय टी मधील कोव्हिड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना त्रास वाढल्यामुळे पंढरपुरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना सोलापूर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.

संजय वाईकर यांनी पत्रकार म्हणून अनेक वर्षे काम केले. शहरातील दैनिक निर्भीड आपल मतचे संपादक म्हणून ते काम करत होते. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देखील त्यांचे काम सुरू होते. तीन वर्षापूर्वी त्यांची भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली होती. सोलापूर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: July 27, 2020, 8:32 AM IST
Tags:

ताज्या बातम्या