• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • BJP मध्ये मोठं खिंडार, राज्यात पक्षातून एकामागोमाग एक Outgoing सुरुच

BJP मध्ये मोठं खिंडार, राज्यात पक्षातून एकामागोमाग एक Outgoing सुरुच

भाजपला (BJP) एकामागोमाग एक झटका बसत आहे. एकामागोमाग एक जण पक्षाला रामराम करताना दिसत आहे.

  • Share this:
    बुलडाणा, 28 ऑक्टोबर: भाजपला (BJP) एकामागोमाग एक झटका बसत आहे. आता बुलडाणा (Buldana district) जिल्ह्यात भाजपला मोठं खिंडार पडल्याचं वृत्त समोर येत आहे. कालच उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) टीम ओमी कलानीतील (omie kalani) 22 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) घड्याळ आपल्या हाती बांधणार असल्याचं वृत्त समोर आलं. ओमी कलानी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. आता बुलडाणामध्येही भाजपला झटक बसला आहे. बुलडाणामध्ये चिखली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे आजशेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. एक जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद पाणि पुरवठा सभापतींसह काही पंचायत समिती सदस्य आणि शेकडो भाजपचे कार्यकर्ते करणार आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं समजतंय. उल्हासनगरात मोठा राजकीय भूकंप, 22 नगरसेवक राष्ट्रवादीत करणार प्रवेश टीम ओमी कलानीतील (omie kalani) 22 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आपल्या हाती बांधणार आहेत. ओमी कलानी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. हेही वाचा- महाराष्ट्रात नव्या घातक Variant चा धोका, या पाच राज्यांमध्ये शिरकाव कारागृहात असलेले पप्पू कलानी पेरोलवर बाहेर आले आहेत. कारागृहातून पप्पू कलानी बाहेर येताच राजकीय गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरात जाऊन पप्पू कलानी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता टीम ओमी कलानीतील 22 नगरसेवक हे राष्ट्रवादीत सहभागी होत आहेत. मात्र, भाजपने हा दावा फेटाळून लावत हे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून ओमी कलानीने भाजपसोबत आघाडी करत घरोबा केला होता. नंतर शिवसेनेसोबतही जवळीक झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांपासून ओमी कलानी हे दूर झाले आहेत. लातूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद भारतीय जनता पक्षाला (BJP) जिल्हा बँक निवडणुकीत एक मोठा झटका बसला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (latur district central co operative bank election) भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजप उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने काँग्रेसला (Congress) याचा मोठा फायदा होणार असल्याचं स्पष्ट आहे. हेही वाचा- पुणे: शाळेत मारायचा म्हणून तब्बल 16 वर्षांनी रस्त्यात गाठलं, घडला भयावह प्रकार  लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत आहे. 19 जागांसाठी ही निवडणूक होणार असून त्यासाठी काँग्रेस, भाजप, अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज हे बाद झाले आहेत. अर्जांची छाननी करत असताना त्यात असलेल्या त्रृटींमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे सर्व अर्ज बाद केले. त्यामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published: