Home /News /maharashtra /

शिवसैनिकाचा धक्कादायक व्हिडिओ, बंदुकीचा धाक दाखवून ओव्हरटेक, निलेश राणे म्हणतात...

शिवसैनिकाचा धक्कादायक व्हिडिओ, बंदुकीचा धाक दाखवून ओव्हरटेक, निलेश राणे म्हणतात...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर बंदुकीचा धाक दाखवून ट्रॅफिकमधून मार्ग काढत असलेल्या एका गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या गाडीच्या मागच्या बाजूला शिवसेनेचा वाघ (Shivsena) असलेलं स्टिकर होतं.

    मुंबई, 30 जानेवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर बंदुकीचा धाक दाखवून ट्रॅफिकमधून मार्ग काढत असलेल्या एका गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या गाडीच्या मागच्या बाजूला शिवसेनेचा वाघ (Shivsena) असलेलं स्टिकर होतं. एमआयएम आमदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेयर केला. यानंतर आता भाजपनेही (BJP) शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 'ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ते पाहता राज्याचे युवा नेतृत्व सरकारमध्ये बसून पब, पार्टी आणि फिल्मी दुनियेचा पुरस्कार करतं, त्यावेळी कार्यकर्ते रस्त्यावर नंगानाच करून गोली मारो भेजेमे अशा स्टाईलने वागतात,' अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही यावरून शिवेसेनेवर निशाणा साधला आहे. चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्र मध्ये ??, असा सवाल नीलेश राणेंनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये गाडीचा क्रमांकही स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या व्यक्तीचा शोध घ्या व अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यावर काय कारवाई करतात याकडे विरोधकांपासून सर्वांचेच लक्ष आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BJP, Mumbai, Nilesh rane, Pune, Shivsena

    पुढील बातम्या