मुंबई, 30 मे : भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा केंद्रातील मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. या पदासाठी भाजपमधून काही नावांची चर्चा होत आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत इतरही काही खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यामध्ये महाराष्ट्रातून रावसाहेब दानवे यांच्या नावाचाही समावेश आहे. दानवे दिल्लीत जाणार असल्याने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी आता शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजपचे सरचिटणीस संजय कुटे यांच्या नावाची चर्चा आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी भाजपकडून त्या तोडीच्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपदी बसवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे या पदासाठी भाजप कुणाला संधी देतं, हे आता पाहावं लागेल.
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने मंत्रिपदासाठी फोन केलेल्या नेत्यांमध्ये अनेक जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर काही नवे चेहरेही पाहायला मिळत आहेत.
भाजपकडून कुणाला-कुणाला मिळणार संधी?
दानंद गौडा, अर्जुन राम मेघवाल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले , सुरेश अंगाडी, पीयूष गोयल, बाबूल सुप्रियो, जितेंद्र सिंह, किशन रेड्डी, सुरेश अंगदी, स्मृती इराणी, प्रहलाद जोशी, राजनाथ सिंह, निर्मला सीतारमण, रविशंकर प्रसाद, मुख्तार अब्बास नकवी यांना पंतप्रधान कार्यालयामधून फोन आल्याची माहिती आहे.
VIDEO : कडक उन्हामुळे होतंय अंड्याचं ऑम्लेट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Raosaheb Danve, Vinod tawade