नगर जिल्ह्यात कमबॅक करण्यासाठी भाजपचा नवा प्लॅन

नगर जिल्ह्यात कमबॅक करण्यासाठी भाजपचा नवा प्लॅन

नगरमध्ये पुन्हा कमबॅक करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे, अहमदनगर, 11 जानेवारी : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे मातब्बर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विखे यांच्या प्रवेशाचा अहमदनगर जिल्ह्यात चांगला फायदा होईल, अशी अपेक्षा भाजपला होता. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत उलटच झालं. भाजपला आपल्या हक्काच्या जागाही गमावाव्या लागल्या. त्यामुळे नगरमध्ये पुन्हा कमबॅक करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी भाजपने प्रथमच दोन जिल्हाध्यक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. नगर शहर आणि जिल्हा ग्रामीण असे भाजपचे दोन जिल्हाध्यक्ष असतील. या अध्यक्षपदाच्या नेमणुकीचा निर्णय हा प्रदेश पातळीवर घेतला जाणार असल्याचे भाजप नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं.

शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या गाडीला भीषण अपघात, 3 जण गंभीर

अहमदनगरमध्ये भाजपकडून जिल्हाध्यक्षपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. या पदासाठी जिल्ह्यातून दक्षिण भागातून 17, उत्तर विभागातून 14 आणि नगर शहरातून 9 जणांनी मुलाखती दिल्या आहेत.

या मुलाखतींमध्ये कुठलाही निर्णय झाला नाही. हा अहवाल प्रदेश कार्यकारणीकडे पाठवला जाणार आहे, त्यावर ते निर्णय घेतील असे हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. भाजपच्या कार्यक्रमात अहमदनगरमधील सर्व दिग्गज उपस्थित होते. खासदार सुजय विखे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते, माजी मंत्री राम शिंदे शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे आणि माजी खासदार दिलीप गांधी या सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

जिल्हातील भाजपचे सर्व मोठे नेते उपस्थित असतानाही अध्यक्षाची निवड होऊ शकली नाही. याचा अर्थ पक्षांमध्ये मतभेद पुन्हा एकदा समोर आलं आहे. मात्र भाजपमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 11, 2020, 8:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading