मुंबई, 16 ऑगस्ट: आजपासून राज्यात भाजपच्या (Bjp) नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) सुरू होत आहे. त्यासाठी हे मंत्री पदभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात येत आहेत. मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. चारपैकी खासदार कपील पाटील, डॅाक्टर भारती पवार, डॅाक्टर भागवत कऱ्हाड हे आजपासून या यात्रेस सुरूवात करत आहे.
केंद्रीय सुक्ष्म लघू उद्योग मंत्री नारायण राणे मात्र 19 ॲागस्टपासून मुंबईतून या यात्रेची सुरूवात करणार आहेत. 560 किमीचा प्रवास हे मंत्री या यात्रेतून करणार असून राज्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन ही यात्रा केली जात आहे. त्यात मराठवाडा, कोकण प्रांत पूर्णपणे पिंजून काढला जाणार आहे.
अशी असेल नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा
19 आणि 20 ऑगस्ट असे दोन ही यात्रा मुंबईत असेल.
21 ऑगस्टला वसई- विरार
23 ऑगस्टला दक्षिण रायगड
24 ऑगस्टला चिपळूण
25 ऑगस्टला रत्नागिरी
26 ऑगस्टला सिंधुदुर्ग
19 ते 26 असा या जन आशीर्वाद यात्रेचा कालावधी असणार आहे. मुंबईहून सुरु होणाऱ्या या यात्रेचा सिंधुदुर्ग येथे समारोप होईल.
मुंबई: वंशाच्या दिव्यासाठी न्यायाधीशाच्या मुलीचा अमानुष छळ; 8 वेळा गर्भपात करून दिल्या नरकयातना
कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा
आज केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला ठाणे शहरातील आनंदनगर चेकनाक्याहून सुरूवात होणार आहे. 5 व्या दिवशी 20 ऑगस्टला भिवंडी तालुक्यात त्यांच्या यात्रेची सांगता होईल.
लोकल फेऱ्यात वाढ; पाच दिवसांत विक्रमी पासची विक्री, डोंबिवलीकर आघाडीवर
या यात्रेदरम्यान कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व, अलिबाग, रेवदंडा, पेन, पनवेल, उरण, नवी मुंबई, कल्याण शहर, शहाड, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, किनवली, शहापूर आदी विविध भागातून यात्रा काढली जाणार आहे. भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी ही माहिती दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Narayan rane