'अहमदनगरमधल्या दहशतीला भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार'

'अहमदनगरमधल्या दहशतीला भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार'

अहमदनगरमधल्या दहशतीला भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं असल्यानं सर्व जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांची आहे असंही ते म्हणाले.

  • Share this:

अहमदनगर,ता.08 एप्रिल : अहमदनगरमधल्या दहशतीला भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं असल्यानं सर्व जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांची आहे असंही ते म्हणाले. शिवसैनिकांच्या हत्येनं परिस्थिती स्फोटक बनलेली असताना रामदास कदम यांनी आज अहमदनगरला भेट देऊन त्या दोन शिवसैनिकांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं.

नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. गेली अनेक वर्ष अहमदनगरमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं गुंडगिरी पोसली आहे. या पक्षांच्या नेत्यांचे व्यावसायिक आणि कौटुंबिक संबंध असून त्यातूनच ही दहशत तयार झाली असा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काही पोलिस अधिकारी गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली. दोनही शिवसैनिकांच्या कुटूंबियांची सर्व जबाबदारी शिवसेना घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2018 06:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading