भाजप नेत्याच्या 'त्या' सूचक वक्तव्याने खळबळ

भाजप नेत्याच्या 'त्या' सूचक वक्तव्याने खळबळ

कभी कभी दो कदम आगे बढने के लिए एक कदम पीछे हटाना पडता है! हे वक्तव्य आहे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांचं. आता महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर हे विधान असेल तर त्याचा अर्थ मोठा असू शकतो.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : 'कभी कभी दो कदम आगे बढने के लिए एक कदम पीछे हटाना पडता है!' हे वक्तव्य आहे भाजपच्या बड्या नेत्याचं. महाराष्ट्रात भाजप -सेना युती ताणली गेल्यानंतर सत्तासमीकरण बदललं आणि शिवसेनेनं काँग्रेस- राष्ट्रवादीशी हातमिळवणी सुरू केली. भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी शिवसेनेची ही नवी युती केवळ सत्ताकांक्षेपोटी जुळवलेली तडजोड असल्याचं म्हटलं आहे.

एकमेकांशी ताळमेळ नसलेलं हे सरकार पाच वर्षं कसं टिकणार आणि कसा विकास करू शकणार, असे प्रश्न जनसामान्यांनाही पडले आहे. आम्ही सध्या यावर पक्ष म्हणून काही भाष्य करू इच्छित नाही.

महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीविषयी  विचारलं असता विजवर्गीय यांनी स्पष्ट केलं, "आम्ही या संभावित सरकारला पाडणार नाही. उलट आम्ही तर आशीर्वादच देऊ."

वाचा - सत्तास्थापना सध्याच शक्य नाही, वेळ लागणार, शरद पवारांचं सगळ्यात मोठं विधान

भाजपने तत्कालीन जम्मू काश्मीरमध्ये विरुद्ध विचारधारा असणाऱ्या 'पीडीपी'शी युती कशी केली असे प्रश्न विचारले जातात. त्यावर विजयवर्गीय म्हणाले, "आम्ही विरुद्ध विचारांच्या पीडीपीशी युती केली, पण त्यामागे आमचा उद्देश पहिल्यापासूनच ठरलेला होता. ते लक्ष्य आधीच ठरलेलं होतं. काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 हटवल्यानंतर आता आम्ही ती तडजोड का केली हे स्पष्ट केलं आहे."  कधी दोन पावलं पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे येणं क्रमप्राप्त असतं, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

---------------

अन्य बातम्या

शिवसेना हिंदुत्व सोडणार का? सावरकरांच्या नातवानं व्यक्त केला हा विश्वास

गडकरींच्या 'गुगली'वर शरद पवारांचा 'षटकार', एकदा पाहाच हा VIDEO

Aadhaar च्या नव्या नियमाची अफवा, बँक खात्यासाठी घेतला हा निर्णय

First published: November 15, 2019, 8:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading