जेपी नड्डा म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं, पण...

जेपी नड्डा म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं, पण...

महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं. पण, राजकारणात धोका होत असतो

  • Share this:

मुंबई, 8 ऑक्टोबर: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्रात काय चाललंय, काय नाही काहीच कळत नाही आहे. कोविड-19 च्या काळात काम करण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठेवलं आहे, अशा शब्दांत जेपी नड्डा यांनी आरोप केला.

हेही वाचा...राजेंच्या विरोधात प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या जहरी टीकेवरून मराठा समाज आक्रमक

महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं. पण, राजकारणात धोका होत असतो, असंही नड्डा यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना निवडून दिलं होतं. पण महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही पक्षांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला. आगामी काळात हे तिन्ही पक्ष विरोधी बाकावर असतील आणि एकटा भाजप सत्तेवर असेल, असा विश्वास जेपी नड्डा यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र भक्ती आणि शक्तीची भूमी...

भाजपच्या कार्यकारणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. केंद्रात दिल्लीतून जे.पी.नड्डा, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे देखील उपस्थित आहे.

जेपी नड्डा म्हणाले, महाराष्ट्र भक्ती आणि शक्तीची भूमी आहे. महाराष्ट्रात पक्ष सदस्य संख्या 1 कोटीपेक्षा जास्त आहे, याबद्दल मी अभिनंदन करतो. आपला देश फक्त भौगोलिक नाही तर सांस्कृतिक दृष्ट्या एक आहे. जर शरद पवार कंत्राटीच्या बाजूने बोलले तर ते चांगलं आणि मोदी बोलले तर मग ते शेतकरीविरोधी असं कसं? असा सवाल देखील जेपी नड्डा यांनी यावेळी उपस्थित केला. काँग्रेस पक्षानं जाहीरनाम्यात जे आश्वासन दिलं ते आम्ही पूर्ण केलं. आता तेच राहुल गांधी ट्रॅक्टरवर सोफा लावून फिरत आहे, अशा शब्दांत नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. केंद्र सरकारनं मंजूर केलेला कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. त्याबद्दल तळागाळ्यातल्या लोकांना माहिती द्या. भाजप ट्रॅक्टर, नांगर आणि शेतक-यांचाही सन्मान करणारं आहे. स्वामीनाथन अहवालाला लागू करण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे. अनेक जण स्वत: ला शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेतात. पण खरं काम शेतकऱ्यांसाठी मोदींनी केलं आहे, असंही जेपी नड्डा यावेळी म्हणाले.

हेही वाचा...

दरम्यान, राज्यातून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत समावेश झालेल्या विनोद तावडे आणि सुनील देवधर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Published by: Sandip Parolekar
First published: October 8, 2020, 6:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या