मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...तेव्हा वडिलांना मातोश्रीत ठेवून फाईव्ह स्टारमध्ये कोण होतं?', भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

'...तेव्हा वडिलांना मातोश्रीत ठेवून फाईव्ह स्टारमध्ये कोण होतं?', भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Uddhav Thackeray-BJP

Uddhav Thackeray-BJP

मुंबईवर जेव्हा संकटं येतात तेव्हा शिवसैनिक रस्त्यावर असतो, पण भाजपवाले कुठे असतात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 21 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही जोरदार निशाणा साधला. मुंबईवर जेव्हा संकटं येतात तेव्हा शिवसैनिक रस्त्यावर असतो, पण भाजपवाले कुठे असतात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. 26 जुलैचा पूर असो किंवा 26/11 चा हल्ला संकटाच्या काळात शिवसैनिक रस्त्यावर येतो आणि मुंबईकरांची मदत करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 26 जुलैच्या पुरात मुंबईकरच मुंबईकरांसाठी झटत होते, हे खरे आहे. पण आज त्या दाहक आठवणींचे भाषण करणारे 26 जुलैच्या पुरात आपल्या वडिलांना मातोश्रीत सोडून स्वत: पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसले होते.. त्याचे काय? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. 26/11 च्या हल्ल्यात पण मुंबईकर मुंबईकरांसाठी जातपात, पक्ष न बघता मदत करत होते. नरिमन हाऊस, ताज या परिसरात आमचा कमलाकर दळवीसुद्धा मदत करत होता. आज भाषण करणारे मातोश्रीच्या बाहेर आले होते का? असा टोला आशिष शेलार यांनी हाणला. बॅण्ड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलींना वाचविताना दुर्दैवी मृत्यू झालेला रमेश वाळूंज हा कार्यकर्ता भाजपाचा होता. जेव्हा त्याने केलेले धाडस चर्चेत आले तेव्हा हा आमचा कार्यकर्ता आहे असे सांगत हे घरी पोहचले, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. कोरोनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पीपीई कीट घालून रुग्णालयात जाऊन रुग्णांना धीर देत होते, तेव्हा तुम्ही घरी बसला होतात. स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपापासून गरिबांना भाज्या, धान्य वाटणारे शेकडो कार्यकर्ते भाजपचे होते हे तुम्हाला कसं दिसणार? तुम्ही घरी बसला होतात, असं प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी दिलं आहे. 'मुंबईचा ताळेबंद मांडायचा झाला तर बरेच मुद्दे मांडता येतील आणि महापालिकेचा ताळेबंद मांडायचा तर सत्ताधीशांच्या भ्रष्टाचाराचे पारडे जड ठरेल. हिशेब होणारच आहेत सगळ्याचे... ते आम्ही नाही मुंबईकर करणार आहेत. मुंबई जिंकायला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह येणार म्हणून तुम्ही ठरवलंत आणि तुम्ही आधीच घाबरून गेलात की काय? यावेळी मुंबई ही मुंबईकरांना जिंकायची आहे... भाजपा मुंबईकरांसाठी लढणार आहे.  मुंबईकरांना बदल हवाय...मुंबईकरांचं ठरलंय! म्हणून काही जणांचं पित्त खवळलंय!!,' असं म्हणत आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
First published:

Tags: Ashish shelar, BJP, Shivsena, Uddhav thackeray

पुढील बातम्या