मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'तुम्हाला बघितल्यानंतर पारणं फिटतं', भर मंचावर उदयनराजे भावूक

'तुम्हाला बघितल्यानंतर पारणं फिटतं', भर मंचावर उदयनराजे भावूक

"ऑलवेज देअर फॉर यू. मनापासून, खरोखर... काय बोलायचं.. तुम्हाला बघितल्यानंतर पारणं फिटतं ना, तसं झालं. शप्पथ सांगतो, मनापासून एवढा जीव लावला ना तुम्ही त्याची कशी परतफेड करु मला माहिती नाही", असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

सातारा, 23 डिसेंबर : सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आज खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भावूक झाले. सातरकर आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत असताना उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी सातारकरांना 'ऑलवेज देअर फॉर यू' म्हणत माझ्यावर जीव लावणाऱ्यांची मी कशी परतफेड करु? असं म्हणत भर मंचावर त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रचंड भावनिक (Emotional) झालेलं बघायला मिळालं.

उदयनराजे नेमकं काय म्हणाले?

"ऑलवेज देअर फॉर यू. मनापासून, खरोखर... काय बोलायचं.. तुम्हाला बघितल्यानंतर पारणं फिटतं ना, तसं झालं. शप्पथ सांगतो, मनापासून एवढा जीव लावला ना तुम्ही त्याची कशी परतफेड करु मला माहिती नाही. मी कामाच्या स्वरुपाने ते करतो. मनापासून आय लव्ह यू टू मच.. इन्फिनिटिव्ह", असं बोलून उदयनराजेंनी आपलं भाषण थांबवलं. यावेळी उदयनराजे प्रचंड भावनिक झाले होते.

हेही वाचा : राज्यात दिवसभरात 23 नवे ओमायक्रोनबाधित, पुण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद, त्यापाठोपाठ मुंबईचा नंबर

शिवेंद्रराजेंवर निशाणा

आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे या दोन्ही भावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातूनच ते एकमेकांवर भर मंचावर किंवा सार्वजनिकरित्या टीका करत असल्याचं समोर आलं आहे. शिवेंद्रराजेंनी काही दिवसांपूर्वी उदयनराजेंवर टीका केली होती. यामध्ये उदयनराजेंची गँग म्हणजे नारळफोड्या गँग असा उल्लेख केला होता. शिवेंद्रराजेंची ही टीका उदयनराजे यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे ते वारंवार या टीकेवर उत्तर देत आहेत. त्यांनी आजच्या कार्यक्रमातही भाषण करताना या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा : 'उदयनराजेंच्या बुद्धीचा अविष्कार आणि पराक्रम सर्वांनी पाहिलाय', शिवेंद्रराजेंचा खोचक टोला

आम्हाला नारळफोडी गॅंग असा उल्लेख केला असला तरी आम्ही कामे केली म्हणून नारळ फोडतो. एखाद्याचं संपूर्ण घरदार उद्ध्वस्त केलं नाही. चर्चेला यायचं असेल तर उदयनराजे कधीही तयार आहे. मात्र धाडस पाहिजे, असं आव्हान उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना दिलं. कारण नसताना लहान मुलांसारखी वैयक्तिक टीका आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडून सुरु आहे, असंदेखील ते यावेळी म्हणाले. दरम्यान, व्यासपीठावर भाषण करताना उदयनराजे यांनी 'काय बाई सांगू? कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज' हे गाणं गायलं.

First published: