मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आधी अजितदादा नंतर थेट शरद पवारांवरच आरोप, उदयनराजेंची डब्बल बॅटिंग

आधी अजितदादा नंतर थेट शरद पवारांवरच आरोप, उदयनराजेंची डब्बल बॅटिंग

' रयत शिक्षण संस्थेचे कामकाज सुरू नसून ही रयत शिक्षण संस्थेचे खाजगीकरण करण्याचा डाव मांडण्यात आला आहे'

' रयत शिक्षण संस्थेचे कामकाज सुरू नसून ही रयत शिक्षण संस्थेचे खाजगीकरण करण्याचा डाव मांडण्यात आला आहे'

' रयत शिक्षण संस्थेचे कामकाज सुरू नसून ही रयत शिक्षण संस्थेचे खाजगीकरण करण्याचा डाव मांडण्यात आला आहे'

सातारा, 23 ऑक्टोबर : साताऱ्यामध्ये नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले ( Udayan Raje Bhosale )  यांनी शिवेंद्रराजे भोसले (shivendraraje bhosle) यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर आपला मोर्चा आता राष्ट्रवादीकडे वळवला आहे. रयत शिक्षण संस्थेचे खाजगीकरण करण्याचा डाव असून या संस्थेवर एका कुटुंबाचा डाव आहे, असं म्हणत उदनराजे भोसले यांनी शरद पवार (sharad pawar) यांच्यावर टीका केली.

उदयनराजे भोसले हे आज दिवसभर चागंलेच आक्रमक होताना पहायला मिळाले. सकाळच्या सत्रात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टार्गेट केले होते. त्यानंतर दुपारच्या सत्रात त्यांनी थेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना टार्गेट केले. उदयनराजे भोसले यांच्या समवेत सकाळी झालेल्या क्रिडा संकुलनाच्या बैठकीत अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी त्यावेळच्या पालकमंत्र्यांला जोड्यानेच मारले पाहिजेत, मुस्काडले पाहिजेत असं बोलत संपूर्ण बैठक गाजवली होती.

अमरावतीत शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी Suicide note आली समोर

'रयत शिक्षण संस्था ही कोणाच्या एका बापाची नाही. रयत शिक्षण संस्था स्थापन करताना ती रयतेची राहावी गोर गरीब जनतेच्या मुलांच्या शिक्षणासाठी राहावी असा उद्देश कर्मवीर भाऊराव पाटील यांचा होता आणि त्यांच्या या विचाराला धरुन सध्या रयत शिक्षण संस्थेचे कामकाज सुरु नसून ही रयत शिक्षण संस्थेचे खाजगीकरण करण्याचा डाव असल्याचे आणि या संस्थेवर एका कुटुंबाचा डाव असल्याचा आरोप उदयनराजे यांनी शरद पवारांचे नाव न घेता केला.

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरुन बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, 'कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारातून अध्यक्षपद हे सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे गेले पाहिजेत. असे सांगत असताना 'हम करे सो कायदा' हा एका कुटुंबाचा चालला आहे', असा आरोपही उदयनराजेंनी केला.

दाम्पत्यामधील खासगी गोष्टी केल्या सार्वजनिक; पत्नीला कोर्टाचा दणका

यावेळी पत्रकारांनी उदयनराजेंना अजित पवारांवर टीका केल्याबद्दल प्रश्न विचारला असता, उदयनराजेंनी पुन्हा त्याच शब्दातून अजित पवारांवर टीका करताना ते पुन्हा आक्रमक होत त्यांना जनतेच्या हितासाठी निवडून दिले आहे, असे म्हणत पुन्हा आरोप केले.

First published: