सर्वात मोठं मनोमिलन! उदयनराजे आणि रामराजे यांची अचानक झाली भेट

सर्वात मोठं मनोमिलन! उदयनराजे आणि रामराजे यांची अचानक झाली भेट

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान दोन्ही राजेंमधील वाद चांगलाच वाढला होता आणि यामुळे अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

  • Share this:

सातारा, 31 ऑक्टोबर : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर हे सर्व परिचित आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोघे सोडत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान दोन्ही राजेंमधील वाद चांगलाच वाढला होता आणि यामुळे अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आक्रमकपणे मैदानात उतरले आणि साताऱ्यात राष्ट्रवादीच्या बाजूने जोरदार वातावरण निर्मिती झाली. यामुळे उदयनराजेंना पराभवाला सामोरे जावे लागले. उदयनराजेंच्या पराभवानंतर त्यांचा रामराजेंसोबतचा वाद काहीसा शांत झाला होता. मात्र दोघांमधील गेल्या काही महिन्यांपासून असलेला अबोला अखेर आज संपला आहे.

सातारच्या शासकीय विश्रामगृहामधील कक्ष क्रमांक 1 मध्ये रामराजे आणि उदयनराजे यांची अचानक भेट झाली आणि दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या.

यावेळी एकमेकांना कोरोनाबाबत काळजी घेण्यासही या दोन नेत्यांनी सांगितले. मात्र दोन्ही राजेंमध्ये झालेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय गोटात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

ही भेट नेमकी कोणत्या पार्श्वभूमीवर ठरवण्यात आली आणि भेटीत काही राजकीय चर्चा झाली का, याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Published by: Akshay Shitole
First published: October 31, 2020, 7:58 PM IST

ताज्या बातम्या