मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेनेचा भाजपला दे धक्का, सांगलीच्या भाजप खासदारांची खास माणसं 'मातोश्री'वर शिवबंधनात!

शिवसेनेचा भाजपला दे धक्का, सांगलीच्या भाजप खासदारांची खास माणसं 'मातोश्री'वर शिवबंधनात!

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे खासदार आणि भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे खासदार आणि भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे खासदार आणि भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.

सांगली, 20 डिसेंबर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या (gram panchayat election maharashtra 2020) पार्श्वभूमीवर शिवसेनेनं (shivsena) मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सांगलीमध्ये सेनेनं भाजपला (BJP) चांगलाच धक्का दिला आहे.  भाजपचे खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेची वाट धरली आहे.  मुंबईत 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत तासगावच्या नगरपालिका आणि पंचायत समितीच्या सभापतीसह खासदारांच्या शिलेदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे खासदार आणि भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील आणि भाजपाला धक्का बसला आहे. होम ग्राऊंड असलेल्या तासगाव तालुक्यात खासदार संजय पाटील गटाला गळती लागली आहे. संजय पाटील यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे तासगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती जयवंत माळी आणि सावर्डेचे सरपंच प्रदीप माने यांनी खासदार पाटील आणि भाजपला सोडचिट्टी दिली आहे. मराठा आंदोलनात उभी फूट? राज्यव्यापी बैठकीवर मुंबई विभागाचा बहिष्कार या तिघांनी शनिवारी मुंबईमध्ये 'मातोश्री'वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील व जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भारताच्या शेजारी देशात राजकीय पेच, पंतप्रधानांची संसद विसर्जित करण्याची शिफारस तालुक्यातील एकूण 68 पैकी 39 गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 2021 ला तासगाव नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या परिस्थितीत तिघांनी शिवसेनेत केलेला प्रवेश भाजपसाठी व खास करुन खासदार संजय पाटील यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या