मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राजकीय पक्षांकडून ऑफर मिळाली का? संभाजीराजेंनी दिलं रोखठोक उत्तर

राजकीय पक्षांकडून ऑफर मिळाली का? संभाजीराजेंनी दिलं रोखठोक उत्तर

'आंदोलन करणे हा भाग आहे, मात्र यातून मार्ग काय काढता येईल हे देखील पाहणे महत्वाचे आहे. कोरोनामुळे आंदोलन करणे चुकीचे आहे'

'आंदोलन करणे हा भाग आहे, मात्र यातून मार्ग काय काढता येईल हे देखील पाहणे महत्वाचे आहे. कोरोनामुळे आंदोलन करणे चुकीचे आहे'

'आंदोलन करणे हा भाग आहे, मात्र यातून मार्ग काय काढता येईल हे देखील पाहणे महत्वाचे आहे. कोरोनामुळे आंदोलन करणे चुकीचे आहे'

कोल्हापूर, 24 मे: मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांकडून ऑफर येत आहे का, असं विचारले असता संभाजीराजे यांनी वृत्ताचे खंडन केले.

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला वंदन करून महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संभाजीराजेंनी दौऱ्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली.

आजपासून तीन दिवस 'असं' असेल मुंबईतील लसीकरणाचं नियोजन, वाचा सविस्तर

आज मराठा समाजावर अन्याय झाला आहे. न्यायालयात आरक्षण रद्द करण्यात आले आहे. जो गायकवाड समितीचा अहवाल होता तो पूर्णपणे धुडकावून लावला आहे. यावर मार्ग कसा काढायचा आहे. त्यावर काय तोडगा काढता येईल, यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे.  मराठवाडा, खान्देश, असा दौरा करणार असून मुंबईमध्ये येणार आहे, असं संभाजीराजेंनी सांगितले.

'आंदोलन करणे हा एक भाग आहे. आपल्याला काय मार्ग काढता येईल, राज्य सरकार आणि केंद्र सरकारला काय सूचना करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी लोकांची मतं जाणून घेण्यासाठी हा दौरा आहे' असंही संभाजीराजे म्हणाले.

'27 किंवा 28 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांच्या भेट घेणार आहे. त्यांसोबत मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता. त्यांनी भेटीसाठी बोलावले आहे. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी काय भूमिका आहे. ती जाहीर करेल, असं संभाजीराजे म्हणाले.

VIDEO : आणखी एका जिल्हाधिकाऱ्यांची कायद्याला तिलांजली; दुकानदाराला मारली चापट

आंदोलन करणे हा भाग आहे, मात्र यातून मार्ग काय काढता येईल हे देखील पाहणे महत्वाचे आहे. कोरोनामुळे आंदोलन करणे चुकीचे आहे. सर्वांनी आपली तब्येत सांभाळून आंदोलन करायचे आहे, मराठा समाजाचा उद्रेक असं सुद्धा कुणी म्हणू नये, असं आवाहनही संभाजीराजे यांनी केलं.

'राजकीय पक्षांकडून तुम्हाला काही ऑफर येत आहे का असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, मला अशी कोणतीही ऑफर आली नाही, मी पहिल्यांदाच असं काही ऐकत आहे. जर काही ऑफर आली तर मला सांगा', अशी मिश्किल प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली.

'समाजाला वेठीस धरू नये. केंद्र असो किंवा राज्य असो सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. राजकीय नेते कोणत्याही पक्षातील असो, त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. न्यायलयीन लढा आहे, त्यामुळे त्यातून मार्ग काढून समाजाला न्याय द्यावा,' असंही संभाजीराजे म्हणाले.

First published: